Wednesday, June 24, 2026
Homeमुंबईनक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सीआरपीएफ कॅम्पसाठी २ हेक्टर...

नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सीआरपीएफ कॅम्पसाठी २ हेक्टर जमीन.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथील सर्व्हे नं.१५९/२ मधील एकूण ६.९८ हेक्टर क्षेत्रापैकी २ हेक्टर(५ एकर) शासकीय जमीन सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस बल(CRPF)कॅम्प उभारण्यासाठी पोलीस अधीक्षक,गडचिरोली यांना मंजूर करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
महसूल विभागाने दिलेली ही जमीन मंजुरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २०,३१ व ४० तसेच महाराष्ट्र जमीन महसूल(सरकारी जमीनीचे विल्हेवाट लावणे)नियम १९७१ चे कलम ५ व ६ मधील तरतूदींन्वये महसूल मुक्त व सारामाफीने देण्यात आली आहे.त्यासाठी शासनाने काही अटीही घातल्या आहेत.या जमिनीसाठी असलेल्या अटी व शर्तींनुसार,अर्जदार संस्था ही जमीन भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने धारण करेल.शासनाच्या पूर्वमान्यतेशिवाय या जमिनीची विक्री, गहाण,हस्तांतरण किंवा पोटविभागणी करता येणार नाही.तसेच या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठीच करणे बंधनकारक असून इतर कोणत्याही वापरासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.जिल्हाधिकाऱ्यांनी सदर जमीन वन जमीन नसल्याची खातरजमा करणे आवश्यक असून वन विभागाचे अभिप्राय प्राप्त करून घेऊन जमिनीचा ताबा मिळाल्यापासून दोन वर्षांच्या आत मंजूर कामासाठी बांधकामास सुरुवात करणे बंधनकारक राहील,तसेच नियोजन प्राधिकरणांच्या नियमांनुसारच विकास करणे अनिवार्य असेल.याशिवाय,राज्य व केंद्र शासनाच्या सुरक्षेविषयक वेळोवेळी येणाऱ्या आदेशांचे पालन करणे, लगतच्या खातेदारांच्या वहीवाटीस बाधा न आणणे आणि पोच रस्ता उपलब्ध करून देणे बंधनकारक असून वरील कोणत्याही अटीचा भंग झाल्यास सदर जमीन शासनजमा करण्याचा अधिकार सरकारकडे राहील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!