उद्रेक न्युज वृत्त :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नोटबंदी जाहीर केली.त्यानुसार चलनातील ५०० व १,००० रुपयांच्या नोटा चलन बाह्य झाल्या व त्यानंतर २,००० हजाराची व इतर नोटा चलनात आल्या.इतर नोटा अजूनही चलनात तर आहेतच; मात्र दोन हजारांची नोट कुठे गायब झाली याचा थांगपत्ताच लागत नसल्याने सदर बाब नवलाची ठरली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, ३१ मार्च २०२२ रोजीच्या आकडेवारीवरुन, २,००० रुपयांच्या एकूण २१४.२० कोटी नोटा चलनात आहेत. एकूण चलनाचा हा आकडा १.६% आहे.त्यांचे मूल्य ४,२८,३९४ कोटी रुपये आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा असूनही त्या मात्र व्यवहारातून कां गायब झाल्या, हा खरा प्रश्न आहे.
जर कां,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाच चलनातील नोटांची जाण नसेल तर जनता-जनार्दन यांनी कुणावर विश्वास ठेवावा? व चलनातील एवढ्या मोठ्या नोटा गेल्या कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.देश हा डॉ. बाबा साहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारावर खरोखरच चालतो की काय? अशी परिस्थिती हल्ली निर्माण झाली आहे.’चलनातील दोन हजारांच्या नोटांनी बांधलाय फेटा’ असे विदारक चित्र दिसून येत आहे.यांस जबाबदार कोण? एकीकडे बँकांची बँक म्हणते की मोठ्या प्रमाणावर नोटा तर आहेत मात्र त्या गायब झाल्या कश्या व कुठे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.