Saturday, May 2, 2026
Homeनागपूरदोन वर्षीय चिमुकलीचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू... - वडिलांना 'बाय...

दोन वर्षीय चिमुकलीचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू… – वडिलांना ‘बाय बाय’ करण्यासाठी चढली स्टीलच्या श्रीलवर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-वडील कामावर जात असल्याने त्यांना ‘बाय बाय’ करण्यासाठी गॅलरीत आलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला.कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नमस्वी प्रकाश मौदेकर असे मृतक चिमुकलीचे नाव आहे.प्रकाश मौदेकर हे अरविंदनगर येथील गल्ली क्रमांक सहा येथे भाड्याने राहतात.ते दररोज सकाळी कामावर जातात.मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता कामावर निघाले असता नमस्वी त्यांना आवाज देण्यासाठी गॅलरीत पोहोचली.तेथून ती स्टीलच्या श्रीलजवळ पोहोचली व त्यावर चढत असताना तिचा तोल जाऊन ती तिसऱ्या माळ्यावरून खाली पडली. ती बेशुद्ध झाली.हे दृश्य पाहून कुटुंबीयांना मोठाच धक्का बसला.तिला मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.यशोधरानगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वडील कामावर जायला निघाले की नमस्वी त्यांना बघण्यासाठी नेहमी घराच्या गॅलरीत येत होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!