Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूरदोन दिवसात पाच जणांचा तर आज एकाचा मृत्यू झाल्याने गावात उडाली खळबळ …

दोन दिवसात पाच जणांचा तर आज एकाचा मृत्यू झाल्याने गावात उडाली खळबळ …

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- जिल्ह्यातील कोरपना तालुक्याच्या  आवाळपूर गावात दोन दिवसात पाच जणांचा तर आज २९ मे रोजी एकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.मृत पावलेल्यांमध्ये आजाराचे लक्षणे नव्हती.त्यामुळे उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे मृत्यूचे सत्र सुरू असल्याने गावात भीती पसरली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे गावात ओआरएसचे वाटप करण्यात आले आहे.खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.आवाळपूर गावात दोन दिवसात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.महादेव वासेकर वय ७० वर्षे,अंबादास धोटे वय ७२ वर्षे, चंद्रभान सोनटक्के वय ६८ वर्षे,संजय मांदाळे,अहिम शेख वय ३० वर्षे,नानाजी राघोबा चहारे वय ९० वर्षे अशी मृतकांची नावे आहेत.संजय मांदाळे हे मंगळवारला दुपारी शेतात गेले होते.शेतात ते मृत अवस्थेत आढळून आलेत.शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे.

गेल्या २४ तासांत विदर्भातील विविध भागात उष्णतेची लाट जाणवत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.२७ ते २९ मे दरम्यान विदर्भातील विविध भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसाठी हवामान विभागाने बुधवार,गुरुवार साठी यलो अलर्ट जारी केला आहे.गुरुवारपर्यंत सूर्यदेव उष्णतेपासून दिलासा देणार नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.जिल्हात सुरु असलेल्या सूर्यकोपाचे भीषण परिणाम पुढे आले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!