उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख व मुख्य बाजारपेठ गणल्या जाणाऱ्या देसाईगंज येथे सुसज्ज असे बसस्थानक नसल्याने बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या व शहरातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये; याकरिता देसाईगंज येथील नविन बसस्थानकाचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी देसाईगंज नगरपरिषदेचे माजी नगसेवक तथा आरोग्य सभापती सचिन खरकाटे यांनी केली आहे.
देसाईगंज याठिकाणी गडचिरोली,कुरखेडा,लाखांदुर,ब्रम्हपुरी व इतर ठिकाणांहून दररोज प्रवाशी नागरिक,व्यापारी वर्ग व इतर जनता कामाकरिता ये-जा करीत असतात. मात्र देसाईगंज येथे सुसज्ज असे बसस्थानक नसल्याने मुख्य मार्गावरच प्रवाशी नागरिकांच्या बघ्यांची गर्दी वा झुंबड दररोज पहावयास मिळते.अशी झुंबड वा गर्दी देसाईगंजच्या जुन्या बसस्थानकावर असल्याने केव्हा-केव्हा वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने देसाईगंज येथे नवीन बसस्थानकाचे काम तात्काळ सुरू करावे असे खरकाटे यांनी म्हटले आहे.