उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- घटनेचे शिल्पकार,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून १४ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास देसाईगंज शहरातून निघालेल्या रॅलीतील बौद्ध उपासक,उपासिका व इतर नागरिकांना नैनपुर रोड टी पॉइंट येथे मान्यवरांच्या हस्ते शरबतचे वाटप करण्यात आले.

देसाईगंज शहरातील मिलिंद बुद्ध विहार आणि जेतवण बुद्ध विहार यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्या निमित्ताने शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले.बौद्ध उपासक,उपासिका व इतर नागरिक मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
नैनपुर रोड टी पॉइंट याठिकाणी रॅलीचे आगमन होताच डॉ.विजय मेश्राम(माजी कार्यकारी अभियंता), पुरुषोत्तम दुधे विपश्यना केंद्र प्रमुख, नुबिर फुले(अभियंता),सामाजिक कार्यकर्ता तथा समाजवादी पार्टी देसाईगंज तालुका महासचिव प्रितम जनबंधू व इतर मान्यवरांनी मिळून शरबतचे वाटप करून जयंती दिनाचे कार्यक्रम स्वतः पुढाकार घेऊन पूर्णत्वास नेले.