Thursday, August 13, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांना जाहीर आवाहन…-धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाची माहिती...

देसाईगंज पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांना जाहीर आवाहन…-धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाची माहिती देणाऱ्यास मिळणार पारीतोषीक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज शहरापासून काही अंतरावर आरमोरी मार्गे वन विभागाच्या जैव विविधता उद्यान नजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत १४ वर्षीय मुलगी जागीच ठार झाल्याची घटना दिनांक-१ जून रोजी सकाळी ५  वाजेच्या दरम्यान घडली होती.

१४ वर्षीय मुलगी ही नेहमी प्रमाणे पहाटे घरून व्यायाम करण्याकरिता(मॉर्निंग वॉक)फिरायला निघाली होती.जात असतांना वाटेतच देसाईगंज-आरमोरी मार्गावरील वन विभागाच्या जैव विविधता उद्यान नजिक मुख्य डांबरीकरण मार्गावर सकाळी ५ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिली.धडक देऊन डोक्यावरून वाहन गेल्याने त्यात तिचा जबडा बाहेर निघाला व डोक्याला जबर मार लागल्याने शर्वरी पदमाकर बनकर, वय १४ वर्षे,रा.तुकुम वार्ड,देसाईगंज(वडसा) जि.गडचिरोली हीचा जागीच मृत्यू झाला.घटना स्थळावरून अज्ञात वाहन धडक देऊन पसार झाला.मात्र,धडक देणारे वाहन अजूनही मिळालेले नसल्याने देसाईगंज पोलीस ठाण्यातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील सुजाण नागरिकांना आवाहन करीत सदर घटनेबाबत अथवा वाहना बाबत कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्वरित देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप मो.नं.८३२९२९५०५१,सहा.पोलीस निरीक्षक संदीप अगारकर मो.नं.९१६८८०६१४९,पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर मो.नं.९९७५३८२६४१, पोलीस उपनिरीक्षक पोलीस प्रविण बुंदे मो.नं. ९९७५३८२६४१ तसेच देसाईगंज पोलीस स्टेशन  टेलीफोन नंबर- ०७१३७२९५२२७ यावर संपर्क साधावा; सदर घटने संदर्भातील माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून माहीती देणाऱ्यास योग्य ते पारीतोषीक देण्यात येणार असल्याचे देसाईगंज पोलीस ठाण्यातर्फे जाहीर नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम; गडचिरोलीतील स्टील हब व कौशल्य विकासाला चालना- उद्योगमंत्री उदय सामंत – ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याच्या...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचे तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचे आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर...

राज्य शासनाकडून स्वतंत्र ‘गडचिरोली प्रदेश’ घोषित.. – मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण,वाढत्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने संपूर्ण गडचिरोली महसुली जिल्ह्याचा समावेश असलेला...

आजपासून श्रावण महिन्यास सुरुवात; श्रावणात असणार चार सोमवार..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.हा संपूर्ण महिना व्रतवैकल्य,धार्मिक विधी, भगवान शंकराची भक्ती,पूजा आणि उपवासासाठी...

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. – ‘डेटा मायग्रेशन’ व पायलट वेतन देयक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन.. – सुट्टीच्या दिवशीही कोषागार...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान,सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या १ जुलै २०२६ च्या शासन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!