Thursday, July 30, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगर परिषदेने दिव्यांग महिलेचे अतिक्रमण काढले पण धनदांडग्यांवर मेहरबान- वर्षा नांदगावे

देसाईगंज नगर परिषदेने दिव्यांग महिलेचे अतिक्रमण काढले पण धनदांडग्यांवर मेहरबान- वर्षा नांदगावे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरात दिव्यांग व्यक्तिंना सोयी-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने उपयोगी होईल,या दृष्टीने माणुसकीची भिंत म्हणून देसाईगंज शहरातील फव्वारा चौकात १०×१० जागेत छोटासा ठेला उभारण्यासाठी साहित्य गोळा करुन काम सुरु केले असता नगर प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता ३५ ते ४० कर्मचाऱ्यांचा ताफा पाठवुन साहित्य जप्त केले.मात्र, देसाईगंज शहरात अनेक धनदांडग्यांनी शहराच्या मुख्य रहदारी मार्गावर तसेच व्यापारी प्रतिष्ठानांसमोर अतिक्रमण उभारून रस्त्याची रुंदीच कमी केली.त्यावर नगर परिषद प्रशासन कोणतीही कार्यवाही करतांना दिसत नाही. ‘दिव्यांग व्यक्तिवर अतिक्रमणाची कारवाई पण धनदांडग्यांवर मेहरबान’ ही बाब योग्य नाही,असा आरोप विदर्भ अपंग बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेच्या सचिव वर्षा नांदगावे यांनी आज,सोमवार २४ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत केला.
वर्षा नांदगावे यांनी म्हटले की,देसाईगंज परिसरात दिव्यांग व्यक्तिंना मदत करण्यासाठी मी व माझे सहकारी गेल्या २० वर्षापासुन काम करीत आहोत.
समाजातील अनेक सहयोगी प्रवृत्ती जोपासनारे लोक दिव्यांगांना मदतिचा हात पुरवितात.दिव्यांगांना जिवनोपयोगी वस्तु पुरविता याव्यात यासाठी मानुसकिची भिंत या तत्वाला अनुसरुन सहकार्य करता यावे,यासाठी देसाईगंज शहरात १०× १० फुट रुंदीचा ठेला तयार केला.त्यात समाजातील दानशुर व्यक्तिंनी पुरविलेले साहित्य साठवुन ते साहित्य दिव्यांग व्यक्तिंना पुरविण्याच्या द्रृष्टीकोणातुन दिनांक-
८ फरवरीला मी फव्वारा चौकातील रिकाम्या जागेत लोखंडी ठेला उभारण्याचे काम सुरु केले.मात्र
 शनिवार २२ फेब्रुवारी हा प्रशासकिय कामाच्या सुट्टीचा दिवस असतांना सुद्धा नगर प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता ३५ ते ४० कर्मचाऱ्यांचा ताफा पाठवुन साहित्य जप्त केले.अशातच देसाईगंज शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक व्यापाऱ्यांनी
आपली प्रतिष्ठाने उभारुण रस्त्याची रुंदीच गिळंक्रृत केली.यामुळे शहरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.असे असतांनाही त्यांचे अतिक्रमण न काढता दिव्यांग व्यक्तिंसाठी काम करणाऱ्या दिव्यांग महिलेचे छोटेशे अतिक्रमन ताबडतोब ताफा पाठवुन काढणे,ही बाब सुड बुद्धिने करण्यात आल्याचा आरोप विदर्भ अपंग बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेच्या सचिव वर्षा नांदगावे यांनी आज सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केला.त्याच बरोबर काही लोक दिव्यांग व्यक्तिंना द्वेषभावना बाळगून हिन व तुच्छ भाषेचा वापर करतात,यावर आळा घालण्यासाठी प्रत्येक कार्यालयात दिव्यांग तक्रार पेटी तयार करावी,अशीही मागणी याप्रसंगी त्यांनी केली.
डॉ.कुलभूषण रामटेके,मुख्याधिकारी नगरपरिषद देसाईगंज👇    
वर्षा नांदगावे यांनी देसाईगंज शहरातील फव्वारा चौकातील पार्किंगच्या आरक्षित जागेत ठेला उभारण्याचे काम सुरु केले,ही बाब नागरिकांना त्रास निर्माण करणारी होती.सदर व्यक्ति दिव्यांग असल्याने त्यांना त्रास होऊ नये यासाठी जप्त केलेले सर्व साहित्य नगर परिषदेच्या ट्रॅक्टरने नांदगावे यांच्या घरी विना़शुल्क पोहोचते करुन दिले.नगरपरिषदेच्या वतिने अतिक्रम हटाव मोहिम सुरु असुन पोलिस यंत्रणेला सोबत घेऊन येतय २६ तारखे पासुन अतिक्रमण हटाव मोहिम अधिक तीव्र करण्यात येईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!