Monday, September 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनरेंद्राचार्य महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यभर विजय वडेट्टीवारांच्या विरोधात आंदोलने...

नरेंद्राचार्य महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यभर विजय वडेट्टीवारांच्या विरोधात आंदोलने…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संघ आणि संघ प्रणित साधू संत यांनी हिंदुत्व वाचविण्यासाठी जनजागरण केले.साधू संत पाठीशी असल्यामुळे महायुतीचा विजय झाला.नरेंद्राचार्य महाराज यांचेही सहकार्य लाभले,असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले होते.या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर टीका करताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केले.त्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलतांना नरेंद्र महाराज यांच्याविषयी एक वक्तव्य केले.त्यावरून हा वाद सुरू झाला.वडेट्टीवार म्हणाले की,नरेंद्र महाराज याला कुठले दिव्य स्वप्न पडले आहे,मला माहित नाही. राज्यामध्ये साधु-संतांमुळे ही निवडणूक जिंकली म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अवमान आहे.कारण त्याला धार्मिक स्वरूप देऊन धृवीकरण करणारे साधू आणि संत असतील,तर ते साधू आणि संत नाहीत.संताची शिकवणूक सर्व समाजाला एकरूप घेऊन समाजाची उन्नती,प्रगती आणि समाज घडवणं हा उद्देश असतो.असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांचे शिष्य आणि अनुयायी आक्रमक झाले आहेत.श्री संप्रदायाच्या वतीने आज,सोमवारी २४ फेब्रुवारीला राज्यभरात विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात आंदोलन पुकारले आहे.विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी,अशी मागणी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्य आणि अनुयायांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!