Saturday, May 2, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यात जंगली हत्तींचा धुडगूस; पिकांचे केले मोठे नुकसान.. -आमदार रामदास मसराम...

देसाईगंज तालुक्यात जंगली हत्तींचा धुडगूस; पिकांचे केले मोठे नुकसान.. -आमदार रामदास मसराम शेत बांधावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गेल्या अनेक वर्षांपासून  जंगली हत्तींनी गडचिरोली जिल्ह्यात आसरा घेतल्याचे चित्र आहे.जिल्ह्याच्या चहूबाजूंनी धुडगूस घालणाऱ्या जंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या पिंपळगाव-हलबी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची घटना समोर आली आहे.रविवारच्या रात्री शेतात शिरलेल्या हत्तींनी धान,मका व इतर पिकांची नासधूस केल्याने शेतकरी बांधव मेटाकुटीला आले आहे. त्यातच,परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच आज,सोमवार २ मार्च रोजी आमदार रामदास मसराम यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पाहणी केली.यावेळी त्यांनी वन विभागासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाईची तजवीज विना विलंब तात्काळ याबाबत कार्यवाही करावी,” असे उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केली.दरम्यान,वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.प्रसंगी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक तसेच वन परिक्षेत्र अधिकारी यावेळी उपस्थित होते.ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
यावेळी देसाईगंजचे माजी सभापती परसराम टिकले, देसाईगंज काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, परशुराम ठाकरे,भुमेश्वर शिंगाडे,सदानंद दोनाडकर,संदीप धोटे,रोशन मेश्राम,गजेंद्र नाईक,बंडू घरत,देवानंद भोयर, जितेंद्र भोयर,उद्धव घरत,लीलाधर दोनाडकर,रमेश भोयर, हिरा बालापुरे,हेमराज नाकतोडे,सुरेश बुल्ले,श्रावण पत्रे, कुसन बालापुरे,तीमा बालापुरे,प्रफुल धोटे,नीलकंठ राऊत, सुरज पारधी, रितेश गाडगे,मनोहर बुल्ले,टिकाराम धोटे, काशिनाथ धोटे,नीलकंठ भोयर,नेताजी मिसार,प्रभुनाथ कवासे, आनंदराव नाईक,नामदेव नाईक,कुशाल नाईक, आसाराम प्रधान,राजेंद्र राऊत,लिलाबाई प्रधान, हिराजी बुल्ले,प्रेमचंद बुल्ले,सुरज बुल्ले,यादव मेश्राम,केशव मेश्राम,रत्नाकर राऊत,गिरीधर चूलपार,शिशुपाल कमल, महेश राऊत,मुखर्जी राऊत,हिरालाल प्रधान यांचेसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!