- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास,उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत राज्याच्या संपूर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या द्वारे आभासी पद्धतीने(ऑनलाईन)उद्घाटन करून, औद्योगिक प्रशिक्षण संस्था विभागाचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून देसाईगंज येथील इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काल,शुक्रवार ६ जून रोजी शिवराज्यभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करून संपन्न करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून नारायणराव वैद्य आय.एम.सी.सदस्य व डॉ.प्रा.हितेंद्र धोटे यांनी नागरी कर्तव्य,कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा प्रसार,सामाजिक समरसता व पर्यावरण संरक्षण या पाच पंच परिवर्तन मौलिक बाबींचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.या प्रत्येक घटकाचा उद्देश म्हणजे समाजात जबाबदारीची जाणीव निर्माण करणे,भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणे आणि लोकसहभागातून व्यापक परिवर्तन घडवून आणणे हे होय,असे मोलाचे मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आमदार रामदास मसराम,आफताब आलम खान आय.एम.सी.अध्यक्ष, लालसिंह खालसा आय.एम.सी.सदस्य, गोपाल उईके यांनी शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाला मुर्लीधर सुंदरकर,योगेश निकम आय.एम.सी.सदस्य यांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांनी भूषविले होते.तर रविकांत गोतमारे गटनिर्देशक, श्रीमती माया जाधव प्रभारी गतनिर्देशक यांच्या मार्गदर्शनात सदर संस्थेत शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.वाय.नागमोती प्रभारी गटनिर्देशक,
सूत्रसंचालन सी.एम.गरमळे रा.से.यो.समन्वयक व आभार प्रदर्शन जे.टी.काटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.जी.अंबादे,सी.डी.समर्थ, एम.बी.मेश्राम,आर.बी.भोयर,टी.यु.सोयाम,बी.बी.घरडे, कु.एम.सी.चौदंते,बी.एन. नैताम,आर.सी.निखाडे,राहुल कऱ्हाडे,श्रीमती.एन.डी.भडके,जी.जे.ठाकरे,एम.वाय कापगते,एस.एम.मेश्राम,एस.एन.पठाण, कु.ए.आर.सोंदरकर,श्रीमती एन.डी. भडके, पी.बी.धाकडे,शंकर निकुरे,संस्थेतील कार्यरत सुरक्षा रक्षक व रा.से.यो.स्वयंसेवक तसेच संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी सहकार्य केले.
- Advertisement -

