Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आदर्श महाविद्यालयात "जागतिक हृदय दिन" साजरा.. - "सुदृढ आरोग्यासाठी पोषक आहार"...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात “जागतिक हृदय दिन” साजरा.. – “सुदृढ आरोग्यासाठी पोषक आहार” विषयावर मार्गदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज शहरातील आदर्श महाविद्यालयात आज, सोमवार २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी “सुदृढ आरोग्यासाठी पोषक आहार” या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास विद्यार्थी,प्राध्यापकवर्ग तथा कर्मचारीवृंदांच्या उपस्थितीत “जागतिक हृदय दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्रा.दिपाली मैंद यांनी हृदयविकार व जीवनशैलीतील बदल यावर सविस्तर मार्गदर्शन केले.मार्गदर्शनात,आजच्या धावपळीच्या युगात असंतुलित आहार,ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यासाठी संतुलित व पोषणयुक्त आहाराचे महत्त्व अधोरेखित करून पालेभाज्या,ताजे फळे,कडधान्ये, पूर्ण धान्य व दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच जास्त तेलकट,गोड व प्रक्रिया केलेले अन्न(जंक फूड)टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.डॉ.नीलेश हलामी यांनी भूषविले.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन करतांना नियमित व्यायाम,योग व ध्यानाच्या सवयी अंगीकारण्याचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.हर्षा बगमारे यांनी करून या व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पार्थिव भागडकर तर आभारप्रदर्शन कु.नेहा मैंद यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लबने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा.अमोल बोरकर,प्रा.अनिल होळी, प्रा.जितेंद्र राऊत व प्रा.भारती बोरकर यांचे सहकार्य लाभले.या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी संतुलित आहार,ताणनियंत्रण व नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून दिले गेले.तर उपस्थितांनी सदरचा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!