Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीयेत्या बुधवारी गडचिरोली येथे मोफत वैद्यकीय व दंत तपासणी शिबीर..

येत्या बुधवारी गडचिरोली येथे मोफत वैद्यकीय व दंत तपासणी शिबीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे येत्या,बुधवार १ ऑक्टोंबर २०२५ रोजी “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियान अंतर्गत मोफत वैद्यकीय व दंत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद गडचिरोली तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.सदरचे शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय  गडचिरोली येथील बाह्यरुग्ण विभागात सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे.
तपासण्या व उपचार सेवा👇
 
शिबिरामध्ये खालील महत्त्वाच्या आजारांबाबत तपासण्या,निदान व उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
  • पौष्टिक आहार व पोषण जागृती
  • सिकलसेल,थैलेसेमिया,ॲनिमिया व हिमोफिलिया तपासणी.
  • मुख,स्तन व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी
  • तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम
  • दंत तपासणी व नेत्ररोग तपासणी
  • मानसिक आरोग्य तपासणी
  • मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी
  • क्षयरोग तपासणी
स्वच्छता व आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांअंतर्गत जनजागृती👇
या शिबिरात नेत्ररोग अधिकारी,दंतचिकित्सक, शल्यचिकित्सक,अस्थिरोग तज्ञ,भिषक,आयुष वैद्यकीय अधिकारी(आयुर्वेद व होमिओपॅथी)तसेच तज्ञ अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
महिलांसाठी विशेष जागृती👇
शिबिरादरम्यान महिलांचे आरोग्य,कुटुंब नियोजन,मातृ व बाल आरोग्य तसेच पोषण या विषयांवर विशेष भर देण्यात येईल.सर्व तपासण्या व उपचार,सेवा पूर्णपणे विनामूल्य दिल्या जातील.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी जिल्ह्यातील महिला,किशोरवयीन मुली तसेच सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. “स्वस्थ नारी,सशक्त परिवार-निरोगी समाज” हा संदेश आपण घराघरात पोहोचवू या,असेही त्यांनी नमूद केले.
आवश्यक कागदपत्रे👇
शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी विशेषतः महिलांनी आधार कार्ड,राशन कार्ड,आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड सोबत आणावेत,असे कळविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!