Tuesday, September 8, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार...

देसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार पाऊस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल मंगळवारपासून ते आज बुधवार सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.अजूनही पाऊस सुरूच आहे.२४ तासात जिल्ह्यात सरासरी ५१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर २० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून एकट्या देसाईगंज तालुक्यात ९३ मिमी पाऊस कोसळला.त्यातच, जिल्ह्यातून सर्वात जास्त पावसाची नोंद ही देसाईगंज तालुक्याच्या शंकरपुर परिसरात झाली असून शंकरपुर महसूल मंडळात ११५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.त्याचबरोबर,जिल्ह्यातील बारा तालुक्यापैकी सरासरी कोसळलेल्या पावसाच्या नोंदीत देसाईगंज तालुका पहिल्या क्रमांकावर असून येथे ९३ मिमी पाऊस, धानोरा ८५ मिमी,आरमोरी ७७.८ मिमी,कुरखेडा ७१.१ मिमी, कोरची ६१.८ मिमी,गडचिरोली ५७.१ मिमी, एटापल्ली ४७.५ मिमी,चामोर्शी ३५.७ मिमी,मुलचेरा २५.३ मिमी,भामरागड २२.८ मिमी,अहेरी २१.४ मिमी तर सिरोंचा तालुक्यात १९.१ मिमी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
  • सर्वात जास्त पावसाची नोंद झालेली २० महसूल मंडळे👇
  •  शंकरपुर(ता.देसाईगंज)-११५
  •  धानोरा- ९७.०
  • कोरची –९१.६
  •  मुरुमगाव(ता.धानोरा)-९०.२
  •  कढोली (ता.कुरखेडा)-८२.६
  • मसेली (ता.कोरची)-८२.०
  • चातगाव(ता.धानोरा)-८०.२
  • वैरागड(ता.आरमोरी)-८०.०
  • पोटेगाव(ता.गडचिरोली)-७८.१
  • आरमोरी –७८.०
  • देऊळगाव(ता.आरमोरी)-७८.०
  • कोटगुल(ता.कोरची)- ७६.४
  • पिसेवडधा(ता.आरमोरी)-७५.०
  • बेळगाव(ता.कोरची)- ७३.४
  •  पेंढरी(ता.धानोरा)-७२.४
  • देसाईगंज- ७१.०
  • मालेवाडा(ता.कुरखेडा)-७०.३
  •  बाम्हणी(ता.गडचिरोली)-७०.०
  •  कुरखेडा –६६.३
  • पुराडा(ता.कुरखेडा)-६५.२
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!