Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजचे नवे एसडीएम पवनदत्ता.. - युपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी.. - एकाच प्रयत्नात...

देसाईगंजचे नवे एसडीएम पवनदत्ता.. – युपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी.. – एकाच प्रयत्नात ऑल इंडिया रँक बावीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राज्यात मागील सात ते आठ महिन्यांपासून आयएएस अधिकारी म्हणजेच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे सुरू आहेत.राज्यातील विविध जिल्ह्यातील आयएएस तसेच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसह शासनाने रिक्त जागा भरण्यासास सुरुवात केल्याचे दिसून येते.त्यानुसार काल गुरुवारी राज्य शासनाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत गडचिरोली जिल्ह्याला तीन नवीन आयएएस अधिकारी दिले असून त्यांची नियुक्ती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारीपदी करण्यात आली आहे.पूर्वी नांदेडच्या सहाय्यक जिल्हाधिकारी अनौष्का शर्मा यांची कुरखेडा उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर नंदूरबारचे सहायक जिल्हाधिकारी डॉ.जी.व्ही.एस.पवनदत्ता यांची देसाईगंजच्या  उपविभागीय अधिकारीपदी तर जालनाचे सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम.यांची चामोर्शीच्या उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.तर यापूर्वी देसाईगंज तहसीलदार पदावर एका महिन्यासाठी परिविक्षाधीन अधिकारी असणारे सिद्धार्थ शुक्ला यांची चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी येथे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली आहे.
  • कोण आहेत पवनदत्ता👇
देसाईगंजचे नवे एसडीएम पवनदत्ता हे युपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी डॉक्टरची पदवी प्राप्त केली.पण जेव्हा कोविड महामारीने जगाला वेठीस धरले तेव्हा पवनदत्ता यांनी प्रशासकीय सेवेकडे बघितले.त्यानुसार आयएएस अधिकारी होण्याचा निर्धार केला आणि २०२२ ची यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन ऑल इंडिया रँक २२ मिळवून आयएएस अधिकारी बनले.पवनदत्ता हे मूळचे तामिळनाडूतील तिरुपती जिल्ह्यातील रहिवासी आहेत.त्यांचे वडील वेंकटेश्वरलू हे अन्नमय येथे एलआयसी इंडियामध्ये काम करतात,तर त्यांची आई शिक्षिका आहे.यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली तेव्हा त्यांच्याकडे परीक्षेसाठी जास्त वेळ नव्हता.अशा परिस्थितीत,विशेष रणनीती बनवण्याऐवजी,त्यांनी  मूलभूत ज्ञान बळकट करण्याचा निर्णय घेतला.प्रिलिम्स परीक्षेसाठी,त्यांनी मुख्य बाबींकडे लक्ष दिले.होणाऱ्या चुका शोधून त्यात वारंवार सुधारणा केल्या.मुख्य परीक्षेसाठी,त्यांनी चालू घडामोडींच्या छोट्या नोट्स तयार केल्या आणि लेखनाच्या गतीवर लक्ष केंद्रित केले.पर्यायी विषयासाठी,त्यांनी कोचिंगची मदत घेतली आणि मॉक इंटरव्ह्यू देखील दिले.मुलाखतीदरम्यान,त्यांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले,ज्यांची त्यांनी हुशारीने उत्तरे दिलीत आणि पहिल्याच प्रयत्नात पवनदत्ता यांनी देशातून २२ वा क्रमांक मिळवून आपल्या कुटुंबाचे नाव उंचावले. “जर तुम्ही मोठे विचार केले तर तुम्ही आयुष्यात मोठे कराल,नेहमी समाजासाठी काय करता येईल याचा विचार करतो आणि त्या दृष्टिकोनाने यशाकडे वाटचाल करतो.” असे त्यांचे म्हणणे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!