Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरकर फसवेगिरीची सेटिंग करणाऱ्यांवर आयकर विभागाची धाड; मोठा घोटाळा उघडकीस..

कर फसवेगिरीची सेटिंग करणाऱ्यांवर आयकर विभागाची धाड; मोठा घोटाळा उघडकीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-आपली जेवढी ऐपत वा पगार आहे, त्याहीपेक्षा पैसा वा संपत्ती असल्यास कुठून आली? उत्पन्नाचे स्त्रोत कोणते? काय काम करता? व इतर अश्या नाना तऱ्हेच्या भानगडी लागून कायदेशीर उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न आढळून आल्यास अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी व ज्याच्या नावावर असेल त्याला अपसंपदा संपादित करण्यासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन गुन्ह्यास तथा वसुलीस पात्र ठरते.त्यासाठी अनेकजण कमी उत्पन्न दाखवून कर चुकवण्याचे नवनवीन फंडे वापरून कर चुकवेगिरी तसेच फसवेगिरी सेटिंग करणाऱ्यांकडे धाव घेतांना दिसून येतात.मात्र,आयकर विभागाची अश्यांवर करडी नजर असते किंवा याबाबत साधी भनकही लागली तर त्यांच्या कचाट्यातून मुक्त होणे अशक्य असते. अश्याच प्रकारची भनक गोंदियात लागली आणि आयकर विभागाच्या तपास शाखेने गोंदियातील एका प्राप्तिकर व्यवसायी म्हणजेच इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर (आयटीपी)जागेवर छापा टाकला आणि २०० कोटी रुपयांचा कर परतावा घोटाळा उघडकीस आणला. कारवाईत तब्बल दोन हजारांहून अधिक करदात्यांनी बनावट सूट आणि कपातीच्या आधारे आयकर चुकवून मोठ्या प्रमाणात कर परतावा मिळवल्याचे समोर आले आहे.तपासात एक धर्मादाय संस्था आणि त्याचे विश्वस्त देखील या फसवणुकीत सहभागी असल्याचे आढळून आले आहे.जे करदात्यांना ‘८०-जी’ अंतर्गत बनावट देणगी कपात मिळविण्यास मदत करत होते.या प्रक्रियेत,प्राप्तिकर व्यवसायी देणगीच्या रकमेच्या दोन टक्के कमिशन आकारत असे. त्याचप्रमाणे संबंधित प्राप्तिकर व्यवसायी आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरतांना ‘अन्य कोणत्याही कॉलममध्ये बनावट आकडे टाकून बनावट सूट मिळवण्याचा दावा करत असे. याशिवाय,तो अशा तरतुदींनुसार सूट देण्याचा उल्लेख करत होता,जे भारतीय नागरिकांना लागू होत नाहीत. त्यामुळे ही एकप्रकारची फसवणूक असून फसवणुकीच्या बदल्यात प्राप्तिकर व्यवसायी करदात्यांकडून परतफेडीच्या रकमेच्या १० टक्क्यापर्यंत कमिशन आकारत असे.गोंदिया व्यतिरिक्त आणखी काही जिल्ह्यांच्या ठिकाणी अश्याच प्रकारे कर परतावा फसवेगिरी केल्या जात असल्याची माहिती आयकर विभागाच्या हाती लागली असून येत्या पुढील काळात अनेकांचे पितळ उघडे पडणार असल्याची माहिती आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!