उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- राज्यातील सहा महसूल विभागातील तहसीलदार संवर्गातील बदलीसाठी पात्र असलेल्या तहसीलदारांची बदली यादी महसूल विभागाचे सहसचिव माधव वीर यांच्या स्वाक्षरीने गुरुवारी ९ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे.देसाईगंजचे तहसीलदार संतोष महाले यांची गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात बदली करण्यात आली आहे.संतोष महाले २००९ मध्ये यापूर्वी सुद्धा देवरीचे तहसीलदार म्हणून कार्यरत होते.बदली यादीने ‘कही खुशी तर कही गम’ चा माहोल असून ज्यांना खरोखरच बदली पाहिजे होती. त्यांच्या नावाचा समावेश नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.