- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):- “आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!” आणि “जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!” अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ओबीसी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर आणि हक्कांवर अत्यंत अभ्यासपूर्ण व सडेतोड भाष्य करण्यात आले. जनगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम करावा यासाठी सरकार विरोधात एल्गार करण्याच्या निर्णयाच्या संबंधाने आज,रविवार २४ मे रोजी देसाईगंजच्या माता वार्डातील माता मंदिर समजभवणात महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली.या पत्रकार परिषदेला लोकमान्य बरडे अध्यक्ष ओबिसी समाज संघटना देसाईगंज,ज्ञानदेव पिलारे, माणिक पिलारे,विलास ठाकरे,चक्रधर पारधी,धनपाल मिसार,प्रा.दामोधर शिंगाडे,नरेश चौधरी,ज्ञानेश्वर कवासे, सागर वाढई,किशोर पिलारे,राजेंन्द्र बुल्ले,प्रदिप तुपट, अरुण कुंभलवार,गजानन सेलोटे,नितेश मानापुरे,विठोबा मुंगमोडे,सतिश खरकाटे,संतोष कवासे,तांबेश्वर ढोरे,उमेश राउत,उमेश ढोरे,सदाराम ठाकरे,वैष्णवी आकरे यांचेसह तालुक्यातील ओबीसी बांधव उपस्थित होते.
देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली असूनही,त्यात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना(कॉलम)देण्यात आलेला नाही.हा समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा आणणारा प्रकार आहे.जोपर्यंत जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम दिला जात नाही,तोपर्यंत या पक्षपाती जनगणनेवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय ओबीसी समाज बांधवानी एकमताने घेतल्याबाबत व आपल्या अस्तित्वाची आणि संख्येची योग्य नोंद व्हावी,यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.केवळ बहिष्कारापुरते मर्यादित न राहता,या हक्काच्या लढ्याला अधिक धारदार बनवण्यासाठी आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी पुढील रणनीतीची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार,येत्या ५ जून २०२६ रोजी देसाईगंज येथील उपविभागीय कार्यालयावर एक ‘भव्य आणि ऐतिहासिक मोर्चा’ काढण्यात येणार आहे.हा मोर्चा ओबीसी समाजाच्या एकजुटीचे आणि स्वाभिमानाचे विराट दर्शन घडवणारा ठरेल. “हक्कासाठी लढा, एकजुटीची गरजा” हे ब्रीद उराशी बाळगून,ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आपला सन्मान टिकवण्यासाठी समस्त ओबीसी समाज बांधवानी,माता-भगिनींनी,तरुणांनी आणि सर्व विचारवंतांनी या भव्य मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून आपले योगदान द्यावे,असे आवाहन देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -

