Friday, May 1, 2026
Homeगोंदियादुचाकीला ट्रक-ट्रेलरची धडक; मागे बसलेल्या महिलेचा चेंदामेंदा..

दुचाकीला ट्रक-ट्रेलरची धडक; मागे बसलेल्या महिलेचा चेंदामेंदा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एका व्यक्ती सोबत दुचाकीने जात असतांना वाटेतच भरधाव वेगात असलेल्या ट्रक-ट्रेलरने दुचाकीला जोरदार धडक देताच दुचाकीवरील महिला ट्रेलरच्या चाकात येऊन शरीराचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत पावली तर दुचाकी चालविणारा दुसरीकडे पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना काल सोमवारी दुपारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वर देवरी शहरापासून एक किलोमीटर अंतरावरील सुखसागर हॉटेल समोर घडली.अपघातात सालेकसा तालुक्यातील गिरोला येथील ३६ वर्षीय सेखा सुरेश पंधरे असे मृत महिलेचे नाव असून जियालाल महादेव छोटे रा.सोनारटोला असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
दुचाकीस्वार दोघेही नवाटोलाकडून एमएच ३५-एव्ही ४५८० क्रमांकाच्या दुचाकीने शिरपूरकडे जात होते.अश्यातच नवाटोला येथील राष्ट्रीय महामार्गावरील सुखसागर हॉटेल समोर येताच सीजी ०४-एनके ३०२६ क्रमांकाच्या ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.जोरदार धडक बसताच दुचाकीवर मागे बसलेली सेखा पंधरे ट्रेलरच्या चाकात आल्याने तिचा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाली.तर दुचाकी चालक जियालाल बाजूला पडल्याने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रेलर घटनास्थळावरून फरार झाला.अपघाताची माहिती देवरी पोलिसांना मिळताच  पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत फरार ट्रेलर व चालकाला शिरपूर तपासणी नाक्यावर  ताब्यात घेतले.जखमी जियालाल याला देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्याच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!