Thursday, August 13, 2026
Homeदेसाईगंजदुचाकीची पीकअपला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू.. - देसाईगंजच्या कुरुड फाट्यावरील आजची...

दुचाकीची पीकअपला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू.. – देसाईगंजच्या कुरुड फाट्यावरील आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड फाटा बसस्थानक नजीक दुचाकीची समोरून येणाऱ्या पीकअपला जोरदार धडक बसल्याने घडलेल्या अपघातात २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली.साहिल दिपक पेंद्राम वय २० वर्षे असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून पेंद्राम कुटूंबीय मूळचे गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील रहिवासी आहेत. तर मृतक साहिलचे वडील दिपक पेंद्राम हे कुरुड येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत प्रयोगशाळा सहाय्यक पदावर कार्यरत असल्याने ते गेल्या आठ ते दहा वर्षांपासून देसाईगंज तालुक्याच्या कुरुड येथे वास्तव्यास आहेत.
माहितीनुसार,साहील हा आज गुरुवारच्या सकाळी साडे दहाच्या सुमारास एकटाच दुचाकीने कुरुड येथून देसाईगंजला काही कामानिमित्त जाण्यासाठी निघाला होता.दरम्यान,कुरुड फाटा नजीक दुचाकीने पोहचताच देसाईगंज-आरमोरी मार्गावर डाव्या बाजूला काही वाहने उभी असल्याने त्याने दुचाकी समोर घेण्याचा प्रयत्न केला.याचवेळेस कुरुड येथील एक पीकअप वाहन नायरा पेट्रोल पंपावरून डिझेल भरून लोहा घेऊन शिवराजपुर मार्गे कोकडी येथे जाण्यासाठी निघाला असता दुचाकीची पीकअपला जोरदार धडक बसली.यात साहिलच्या डोक्याला जबर मार लागल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन काही वेळातच त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू करून कुरुड गावातील पोलीस पाटील मंगेश मडावी यांना माहिती दिली.मडावी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनेबाबत देसाईगंज पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.पुढील तपास देसाईगंज पोलीस प्रशासन करीत असून  साहिलच्या अचानक जाण्याने पेंद्राम कुटूंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घोरपडींच्या शिकार प्रकरणी चौघांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावंगी बिटात दोन घोरपडींची शिकार करून त्यांचे मांस कापतांना चौघांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करून घटनास्थळावरून...

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम; गडचिरोलीतील स्टील हब व कौशल्य विकासाला चालना- उद्योगमंत्री उदय सामंत – ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याच्या...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचे तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचे आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर...

राज्य शासनाकडून स्वतंत्र ‘गडचिरोली प्रदेश’ घोषित.. – मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण,वाढत्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने संपूर्ण गडचिरोली महसुली जिल्ह्याचा समावेश असलेला...

आजपासून श्रावण महिन्यास सुरुवात; श्रावणात असणार चार सोमवार..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.हा संपूर्ण महिना व्रतवैकल्य,धार्मिक विधी, भगवान शंकराची भक्ती,पूजा आणि उपवासासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!