Sunday, June 21, 2026
Homeचंद्रपूरदागिने स्वच्छ करून देण्याच्या बहाण्यावरून अज्ञात चोरट्यांनी सोन्याची  पोत केली लंपास

दागिने स्वच्छ करून देण्याच्या बहाण्यावरून अज्ञात चोरट्यांनी सोन्याची  पोत केली लंपास

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चिमूर(चंद्रपूर) :- दागिने स्वच्छ करून देण्याच्या नावाखाली एका वृद्ध महिलेकडून २० हजारांची सोन्याची पोत केल्याची घटना सोमवारी (दि.२२) सकाळी दहा वाजता घडली.पीडितेच्या तक्रारीवरून चिमूर पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

शहरातील नेताजी वॉर्ड येथील मंदा दादाजी साखरकर ही वृद्ध महिला सकाळी एकटीच खाटेवर चहा पीत बसली होती.त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती घरी आला व दागिने साफ करून देतो म्हणून गळ्यातील सोन्याची पोत मागितली.त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने दागिने दिले.चोरट्याने त्याच्याकडील बॅगमधील पावडरचे पॉकेट काढून त्यामध्ये सोन्याची पोत टाकली.तेवढ्यात त्याचा साथीदार आला व त्याने कागदातील प्लास्टिक पिशवी महिलेच्या हातात देऊन ही पिशवी अर्ध्या तासाने उघडा म्हणून सांगितले आणि पोबारा केला.काही वेळाने पिशवी उघडली असता त्यात सोन्याची पोत नसल्याचे उघडकीस आले.या घटनेची माहिती तिने कुटुंबीयांना दिल्यानंतर चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!