Friday, October 9, 2026
Homeचंद्रपूर'त्या' बडतर्फ पोलिसाने हत्येनंतर महिलेची अंगठी विकली आणि २२ हजाराची रक्कमही केली...

‘त्या’ बडतर्फ पोलिसाने हत्येनंतर महिलेची अंगठी विकली आणि २२ हजाराची रक्कमही केली लंपास… – पोलीस तपासात उघड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सुरुवातीला चोरीच्या गुन्ह्यात अडकला,नंतर बडतर्फ झाला.विवाहितेशी सुत जुळून आले खरे,पण त्याचा शेवट हत्येने झाला असल्याची घटना काही दिवसांपूर्वी चिमूर शहरात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती.मात्र,क्राईम करणारा कितीही शातिर असला तरीही डायल एक शून्य-शून्य च्या नजरेतून कधीही सुटूच शकत नाही.चिमूर शहराच्या महिला व्यापारीची हत्या करणारा बडतर्फ पोलीस आरोपी नरेश उर्फ नरेंद्र पांडुरंग डाहुळे वय ४० वर्षे हा पोलिसी खाक्याने पोपटा सारखा बोलू लागला आहे. सुरुवातीला वेगळेच सांगितले तर आता वेगळाच बोलू लागला आहे.त्याला न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.प्रकरणातील अरुणा अभय काकडे वय ३७ वर्षे,नूतन आदर्शन कॉलनी,चिमूर ही मृत महिला आहे.अरुणा यांचे चिमूरमध्ये दुकान होते.त्या नियमितपणे नागपुरात खरेदीसाठी जात होत्या.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी त्या दुकानासाठी कॉस्मेटिक सामानाच्या खरेदीसाठी नागपुरात गेल्या होत्या.तेथून त्या इतवारीत गेल्या मात्र,त्या दिवशी त्या परतल्याच नाही.अशातच काही दिवसांपूर्वी नरेशने घरून पळून आल्याने वाद झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती.मात्र,तपासात सांगीतले की,दोघांचा पळून जाण्याचा बेत होता.मात्र,तीने घरातून कोणतेही दागीने आपल्या सोबत आणलेले नव्हते,या गोष्टीचा राग आल्याने नरेशने गळा दाबून महीलेची हत्या केली. गळा घोटल्यानंतर तिला आठ तास गाडीमध्येच घेऊन नागपुरात फिरला,स्वतःचा मोबाईल हुडकेश्वर परिसरात तर अरुणाच्या मोबाईल शिवणगाव परिसरात फेकल्याची माहिती दिली.त्यानंतर त्याने तिची अंगठी विकली त्यात अंगाठीचे १२ हजार ८०० रुपये मिळाले.तिच्याजवळ असलेली २२ हजाराची रक्कम त्याने आपल्या बँक खात्यात टाकली.अशी माहिती नरेशने चिमूर पोलिसांना दिली.आरोपी नरेश हा चंद्रपूर पोलिसात कार्यरत होता हे विशेष.त्याला चिमूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!