Friday, October 9, 2026
Homeनागपूरनागपूर विमानतळावर पार्सलचा स्फोट; सुरक्षा यंत्रणेची उडाली तारांबळ...

नागपूर विमानतळावर पार्सलचा स्फोट; सुरक्षा यंत्रणेची उडाली तारांबळ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
नागपूर विमानतळावर पार्सलचा स्फोट; सुरक्षा यंत्रणेची उडाली तारांबळ…
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर एका पार्सलमधून जोरदार आवाज झाल्याने सुरक्षा यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.शुक्रवारी सायंकाळी हा खळबळजनक प्रकार घडला.पार्सलमध्ये फटाके होते,हे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
अधिक माहिती अशी की,वाशिम येथील एका महिलेने तिच्या मुंबई येथे राहणाऱ्या भावाला एक पार्सल पाठवले.या पार्सलमध्ये शेतात पिकांची नासधूस करण्यासाठी येत असलेली जनावरे पळवून लावण्यासाठीचे फटाके होते.तिने एका खासगी कंपनीद्वारे पाठवलेले हे पार्सल तातडीने पाठवायचे असल्याने विमानाद्वारे ते पाठविण्याचा निर्णय झाला. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईच्या एका फ्लाईटमधून हे पार्सल जाणार होते.मात्र,ठेवतांना पार्सल फुटले आणि त्यातीलच काही फटाके फुटल्याने जोरदार आवाज आला.यामुळे विमानतळ कार्गो परिसरात एकच खळबळ उडाली.सुरक्षा व्यवस्थाही सतर्क झाली.हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने विमानतळ सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.मात्र,यात धोकादायक असे काहीही नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिली.पुढील तपास सोनेगाव पोलिस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!