Monday, August 24, 2026
Homeआरमोरीतिनदा धानाची चोरी; मात्र चौथ्यांदा चोरीचा फसला डाव..-आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रकरण..

तिनदा धानाची चोरी; मात्र चौथ्यांदा चोरीचा फसला डाव..-आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी :- गोदामातून चोरी केलेले धान त्यांनी शेतकऱ्यांचे आहे; असे सांगून लोहारा येथील एका व्यापाऱ्याला विकले. व्यापाऱ्याकडून पैसे घेऊन दारू,सिगारेट, हॉटेलमध्ये जेवणावर ते उडवत होते.चोरीतून पैसा येत असल्याने कमी वेळात पैसे कमविण्यासाठी त्यांना चोरीचा मार्ग अधिक सुकर वाटू लागला.पालकांना मुले काय करीत आहेत.रात्री कुठे जात होती,याची कल्पनाही नव्हती.

रात्रीच्या वेळेस गोदामात दुसऱ्या चोरांना धानाची चोरी करताना बघून अल्पवयीन मुले चोरीकडे वळली व त्यांनी आपल्या मित्रांना यात सहभागी करून एकाच गोदामातून त्यांनी धानाची चोरी केली. तिनदा धानाची चोरी करण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यावर पुन्हा चौथ्यांदा चोरी करण्यासाठी त्याच गोदामात गेले.मात्र,चौथ्यांदा चोरी करताना डाव फसला आणि ते शेतकऱ्याचा जाळ्यात अडकले गेले.

आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव येथे प्रवीण पटेल यांचे गावाबाहेर डोंगरी परिसरात गोदाम आहे.सदर गोदाम रिकामे राहत असल्याने गेल्या चार पाच वर्षांपासून गावांतील काही शेतकरी गोदामात धानाची साठवणूक करायला लागले.गोदामातून अल्पवयीन मुलासाह आरोपींनी तिनदा धानाची चोरी केली होती. २७ मे रोजी गावांतील काही शेतकरी जेव्हा उन्हाळी धान ठेवण्यासाठी गोदामात गेले असता त्यांना तेथे दुसरा कुलूप लावलेला दिसला.त्यामुळे त्यांनी कुलूप तोडून गोदामात बघितले असता धानाची चोरी झाल्याचे लक्षात आले.चोर पुन्हा चोरी करण्यासाठी येतील म्हणून काही शेतकऱ्यांनी गोदाम परिसरात पाळत ठेवली होती.२९ मे रोजी रात्री गोदामात ठेवलेल्या धानाची चोरी करण्यासाठी जेव्हा दोन अल्पवयीन मुले व एक १९ वर्षीय आरोपी गेले तेव्हा गावातील शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

आरोपी रोहन हरिदास सयाम वय १९ वर्षे रा. देऊळगाव याला चोरी प्रकरणातील अल्पवयीन मुलांनी फूस लावून फिरायच्या बहाण्याने चौथ्या चोरीसाठी नेले होते.तर वृषभ श्यामराव मेश्राम वय २१ वर्षे रा.आरमोरी हा दुसऱ्या व तिसऱ्या चोरीत सहभागी झाल्याने पोलिस तपासात तोही आरोपी ठरला.दोन्ही अल्पवयीन मुले व दोन सज्ञान आरोपी हे शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सगळ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. आई-वडील मोलमजुरी करणारे आहेत.चोरी प्रकरणात पकडला गेलेला एक अल्पवयीन मुलगा हा या प्रकरणातील मास्टर माइंड आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!