उद्रेक न्युज वृत्त
नितेश केराम/चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर :-तहसील कार्यलय कोरपना येथे केंद्रस्तरीय मतदान अधिकारी बी एल ओ यांची महत्वापूर्ण बैठक नायब तहसीलदार तथा मतदान नोंदणी अधिकारी भगत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या मध्ये मौजा-आसन खुद्द यादी भाग क्र.४९ येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ तुकाराम यादव पंधरे यांनी नवीन मतदान नोंदणी,मयत स्थलांतरीत दुबार वगळणी,अस्पस्ट छायाचीत्र वोटर स्लिप वाटप,ई व्ही एम व्ही व्ही पी जनजागृती मोहिम इत्यादी.कामे नेहमी अग्रेसर राहून उत्कृष्टपणे कार्य केले.तसेच मतदान कार्डला आधार कार्ड जोडण्याचे उत्कृष्टपणे कार्य करीत कोरपना तालुक्यातून सर्वात जास्त जोडणीची कामे केल्याबदल नायब तहसीलदार कोरपना येथील भगत यांच्या शुभ हस्ते शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.
प्रसंगी कोरपना तहसील कार्यलयाचे नायब तहसीलदार भगत,भोधे,सित्रू तसेच कोरपना तालुक्यातील सर्व बी एल ओ उपस्थित होते.