Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंज'तप्ती-जलती घमोरियो में' देसाईगंज वीज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवावर उठली? - गावे,शहरे...

‘तप्ती-जलती घमोरियो में’ देसाईगंज वीज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवावर उठली? – गावे,शहरे भट्टीसारखी तापत असतांना वेजेचा लपंडाव..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-यंदा एप्रिल महिन्यातच दिवसागणिक उन्हाची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे.तीव्र उन्हाचा आरोग्याला फटका बसत आहे. वातावरणात उष्मा वाढू लागल्याने भर दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट असतो.प्रत्येकजण उन्हापासून बचाव करण्यासाठी थंडगार सावलीचा आसरा शोधत आहेत.नागरिक उकाड्याने हैराण झाल्याने घरातील कूलर,पंखे गरगर फिरू लागले आहेत.अशातच गावे,शहरे भट्टीसारखी तापत असतांना दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासारखी बत्ती गुल होऊ लागल्याने ‘तप्ती-जलती घमोरियो में’ देसाईगंज वीज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवावर उठली की काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.सूर्यनारायण वर येऊ लागला की,सकाळी ९ ते १० वाजल्यापासून उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण होऊ लागले आहेत.ग्रामीण भागात वाढत्या तापमानामुळे शेतकरी व मजूर हे सकाळच्या सुमारास कामधंद्यांना प्राधान्य देत आहेत.दुपारी उन्हाचा पारा चढत असल्याने घरातील कूलर,पंखे सुरू ठेऊन गर्मी पासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशातच कधी भर दुपारीच तर कधी अर्ध्या रात्रीच बत्ती गुल होत असल्याने ‘हिट यार,हाय गर्मी’ असे म्हणावे लागत आहे.त्यामुळे देसाईगंज वीज पुरवठा कंपनीने थोडा तरी जनतेचा विचार करावा व विजेचा लपंडाव बंद करावा,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!