Friday, September 25, 2026
Homeकुरुडडॉ.बाबासाहेब केवळ दलितांचेच नव्हते तर सर्वांचेच हित जोपासणारे होते- बौद्ध समाजाचे अध्यक्ष...

डॉ.बाबासाहेब केवळ दलितांचेच नव्हते तर सर्वांचेच हित जोपासणारे होते- बौद्ध समाजाचे अध्यक्ष क्षितिज उके यांचे प्रतिपादन-कुरूड येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

कुरूड (देसाईगंज) :- संविधान दिनाचे औचित्य साधून आज दिनांक-२६ नोव्हेंबर २०२३ रोजी कुरूड येथे संविधान दिन सकाळी १०.००वाजेच्या सुमारास गावातील बौद्ध उपासक,उपासीका यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संविधान दिन साजरा करतेवेळी सर्वप्रथम बौद्ध समाजाचे अध्यक्ष क्षितिज उके व गावातील मान्यवरांच्या हस्ते बी.आर.आंबेडकर तसेच शांतीदूत तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर संविधान दिनाचे महत्व पटवून देण्यात आले.संविधान दिनाचे महत्त्व पटवून देतांना कुरूड बौद्ध समाजाचे अध्यक्ष क्षितिज उके म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचेच नव्हते तर सर्वांचेच हित जोपासणारे होते.मात्र आजही काहीजण मनात द्वेष भावना बाळगून त्यांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांचाच विचार केला नाही तर समाजातील शोषित,वंचित व इतर जातींचा विचार करून त्यांना कसे वरचढ करता येणार याकडे त्यांनी संपूर्ण आयुष्य पणाला लावून संविधान लीहिण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.तरीही सुध्दा आजही काहीजण त्यांना ते केवळ दलितांचेच समजणे ही चुकीची मन धारणा असल्याचे उके यांनी म्हटले आहे.

संविधान बदलणे ही कुणाच्या बापांची जहागिरी नाही.यासाठी तसा जन्म घेऊन कर्म करावे लागतात.असे अनेक मान्यवरांनी संविधान दिनाचे औचित्य साधून वक्तव्य केले आहे.सदर कार्यक्रमाच्या वेळी कुरूड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष क्षितिज उके,बौद्ध महिला मंडळ उपाध्यक्ष वंदना घोडेस्वार,उपासक पितांबर हुमणे,अतुल घोडेस्वार,उपासिका सारिका उके, करिष्मा हुमणे,गावातील बहुसंख्य नागरिक तसेच बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!