Tuesday, August 18, 2026
Homeब्रम्हपुरीट्रॅक्टर पलटी; दोघांचा जागीच मृत्यू..!

ट्रॅक्टर पलटी; दोघांचा जागीच मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-लाकूड कटाईची कामे आटोपून ट्रॅक्टरद्वारे परतीच्या वाटेवर असणाऱ्या मजुरांवर काळाने झडप घातल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला,तर दोघेजण गंभीर जखमी व दोघांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना आज,गुरुवार १५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्याच्या गोगाव-सायगाव मार्गावर घडली.अपघातात प्रवीण प्रकाश भोयर वय ३० वर्षे व शिवाजी बळीराम दोडके वय ५० वर्षे दोघेही रा.गोगाव,ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर या मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर नीलकंठ रामचंद्र जरादे वय ४२ वर्षे,ब्रम्हदास उरकुडा भजगवळी वय ५० वर्षे अशी गंभीर जखमींची नावे आहेत.तर राहुल माणिक धारणे वय ३५ वर्षे व अलीफ सुधाकर गजबे वय ३० वर्षे अशी किरकोळ दुखापत झालेल्यांची नावे आहेत.
ब्रम्हपुरी तालुक्याच्या गोगाव येथील सात मजूर  लाकूड तोडणीच्या कामासाठी ट्रॅक्टरने तळोधी येथे गेले होते.तेथील कामे आटोपून आज गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गावाकडे परत निघाले होते. अश्यातच गोगाव-सायगाव मार्गावर येताच धावत्या ट्रॅक्टरचे एक्सल तुटले.यामुळे ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर ट्रॉलीसह मुख्य मार्गाच्या कडेला जाऊन पलटी झाला.यात ट्रॅक्टरवरील दोन मजूर ट्रॉलीखाली दबल्या गेल्याने जागीच ठार झाले.तर अन्य मजूर जखमी झाले. घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली.मेंडकी पोलिसांनी घटनास्थळी पोहचत जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.रोजची रोजी- रोटी कमावून खाणाऱ्या मजुरांवर काळाने झडप घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

आता गडचिरोलीत होणार विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार,आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने गडचिरोली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!