Wednesday, July 8, 2026
Homeभंडाराजेवणासाठी भाजी मागण्याकरिता गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

जेवणासाठी भाजी मागण्याकरिता गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-घराशेजारी राहणाऱ्या एका ५० वर्षीय नराधमाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे.नराधमाने पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.मात्र,शारीरिक बदल आणि तब्बल चार महिने मासिक पाळी न आल्याने कुटुंबीयांनी तिला शासकीय रुग्णालयात नेले असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे कळल्याने पालकांना मोठा मानसिक धक्का बसला.प्रकरणी पीडिता व तिच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लाखनी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(आय),६५(१)सहकलम ४,६ बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला व आरोपी रतनलाल उर्फ जागेश्वर सुरचंद कुळमते वय ५० वर्षे यास अटक केली.
ग्रामीण भागातील ग्रामस्थ आजही एकोप्याने राहतात. त्यातच,घराशेजारी राहणारे गुण्यागोविंदाने एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे पिडीत मुलीचे कुटूंबीय व आरोपी यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याने डिसेंबर २०२५ मध्ये पिडीत अल्पवयीन मुलगी जेवणासाठी भाजी मागण्याकरिता आरोपी रतनलालच्या घरी गेली.रतनलाल घरी एकटाच होता. त्याचवेळेस त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर जीवे मारण्याची धमकी दिली.घडलेल्या प्रसंगाने मुलगी घाबरली आणि तिच्या घरी परतली.तिने तब्बल चार महिने मानसिक धक्का सहन केला.त्यानंतर, शारीरिक बदल आणि चार महिने मासिक पाळी न आल्याने आरोपी नराधमाचे कृत्य समोर आले.प्रकरणी लाखनी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.राज्यात महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतांना,भंडारा जिल्ह्यातील या घटनेमुळे जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘पावसाळा आला आरोग्य सांभाळा..!’ ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाचे कडक निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या आगमनासोबतच ताप, सर्दी-खोकला,डेंग्यू,मलेरिया,टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो.नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,यासाठी सार्वजनिक...

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!