- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी गावात दुर्गोत्सवाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अनेक नागरिकांना उलट्या,मळमळ आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने आज सकाळपासूनच बाधितांनी उपचारासाठी रुग्णालयांकडे धाव घेतली.दरम्यान,घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत.
काल मंगळवारी दुर्गोत्सव आणि दसऱ्यानिमित्त लाखनी तालुक्यातील खराशी गावात जितेंद्र बोंद्रे यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्रीला जेवण केल्यानंतर आज पहाटेपासून गावातील शेकडो नागरिकांना जुलाब, उलटी आणि मळमळचा त्रास जाणवू लागला.काही नागरिकांना तातडीने खराशी येथील उपकेंद्रात दाखल करण्यात आले.तर काहींना भंडारा आणि पालांदूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या सर्व नागरिकांवर उपचार करण्यात येत असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.मात्र,अनेक नागरिकांची प्रकृती एकाच वेळी खालावल्याने अन्नविषबाधेचा संशय व्यक्त केला जात आहे.
- Advertisement -

