Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीजेएसडब्ल्यू स्टील प्लांट इतरत्र हलवा; हजारो शेतकऱ्यांनी सह्या केलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना ...

जेएसडब्ल्यू स्टील प्लांट इतरत्र हलवा; हजारो शेतकऱ्यांनी सह्या केलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर.. – माजी आमदार कृष्णा गजबे यांचेसह तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे.. – प्रकल्पासाठी सुपीक जमिनी कोणत्याही परिस्थितीत देणार नाही; पर्यायी जागा शोधण्यात येईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात येत्या काही कालावधीत होऊ घातलेला जेएसडब्ल्यू स्टील प्लांट इतरत्र हलवण्यासंदर्भात तालुक्यातील कुरूड, कोंढाळा,तुळशी,कोकडी,शिवराजपुर,उसेगाव,नैनपुर येथील हजारो शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काल,शुक्रवार ६ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.
देसाईगंज तालुका हा सर्वगुण संपन्न तालुका आहे. येथील सर्वसामान्य लोकं हे शेतीवर अवलंबून आहेत. अशातच येत्या काळात जेएसडब्ल्यू स्टील प्लांट उभा करण्यास जवळपास हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतीचे अधिग्रहण केले जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला जाऊ शकतो.तालुक्यात इटियाडोह विभागाच्या वतीने शेतीसाठी सिंचनाची सोय उपलब्ध आहे.यामुळे दुबार पीक घेतले जाते.त्याचबरोबर शेतीसह गावठाण असलेली गावे प्लांट साठी उठवली जाऊ शकतात. त्यामुळे परिसरातील लोकं बेघर झाल्याशिवाय राहणार नाही.सदरची बाब ही देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांच्या लक्षात येताच त्यांनी परिसरातील कुरूड,कोंढाळा,तुळशी,कोकडी,शिवराजपुर,उसेगाव,नैनपुर येथील शेतकऱ्यांशी तसेच नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा असण्यापूर्वी देसाईगंज तालुक्यात होऊ घातलेला जेएसडब्ल्यू स्टील प्लांट इतरत्र हलवण्यासंदर्भात काय करता येणार,याबाबत अथक परिश्रम घेतले.त्यानुसार परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन तयार करून माजी आमदार कृष्ण गजबे यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करीत संवाद साधण्यात आला.प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पासाठी सुपीक जमिनी कोणत्याही परिस्थितीत देणार नाही व पर्यायी जागा शोधण्यात येईल,असे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी,नरेश विठ्ठलानी,शंकर पारधी ग्रामपंचायत सदस्य कुरुड,अरुण राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य कुरुड,सामाजिक कार्यकर्ते रोशन ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!