Saturday, June 13, 2026
Homeदेसाईगंजजुनी वडसा येथे 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत वृक्षारोपण..

जुनी वडसा येथे ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत वृक्षारोपण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके,माजी नगरसेवक सचिन खरकाटे व खेळाडू यांच्या हस्ते जुनी वडसा येथील खेळाचे मैदान या ठिकाणी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

देसाईगंज नगर परिषदे अंतर्गत ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ सुरू असून शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. खेळाचे मैदान,नगर परिषद आवारात,शालेय आवारात तसेच इतर ठिकाणी वृक्ष लागवड करून माझी वसुंधरा अभियान ५.० राबविण्यात येत आहे.वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे.प्रत्येकांनी एक झाड लावून त्याची जोपासना केली पाहिजे.असे कुलभूषण रामटेके यांनी वृक्षारोपण करते प्रसंगी सांगितले.जुनी वडसा येथील खेळाचे मैदान या ठिकाणी जवळपास विविध प्रजातींच्या ५० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

वृक्षारोपण करतेवेळी,माजी नगरसेवक तथा भाजपाचे देसाईगंज शहराध्यक्ष सचिन खरकाटे,हमीद पठाण,जवाहर सोनेकर,विलास बोंद्रे,प्रफुल दुपारे, देसाईगंज नगर परिषदेचे कर्मचारी वृंद तसेच जुनी वडसा येथील पोलिस भरतीची तयारी करणारे युवा वर्ग उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!