उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील पूर ओसरू लागला आहे.अशातच सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने नदी,नाले भरभरून वाहू लागले आहेत.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ८ मार्ग पुरामुळे अद्याप बंद पडली आहेत.काही मार्गांवरून पर्यायी मार्ग सुरू झाली आहेत.
१)गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग शिवणी नाला ता.गडचिरोली (पर्यायी मार्ग गडचिरोली पोटेगाव कुनघाडा ते चामोर्शी )
२)आलापल्ली भामरागड रस्ता (पर्ल कोटा नदी), (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड
३)गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (पाल नदी) ता.गडचिरोली
४) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) (मोदुमतूरा नाला) (देवलमारी नाला)ता. अहेरी
५) लखमापूर बोरी गणपुर रस्ता प्रजिमा (हळदीमाल नाला) ता.चोमोर्शी
६) चामोर्शी फराळा मार्कडादेव रस्ता प्रजीमा ता. चामोर्शी (पर्यायी मार्ग शंकरपुर हेटी मार्कडादेव)
७) झिंगानुर कल्लेड देचलीपेठा रस्ता,प्रजिमा ता. सिरोंचा
८) मानापुर-अंगारा रस्ता प्रजिमा ता.कुरखेडा

