उद्रेक न्युज वृत्त
फरी :- देसाईगंज तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फरी येथे सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन २७ जानेवारी रोज शूक्रवारला आयोजित करण्यात आले.विध्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक तथा शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने सांस्कृतिक कला सम्मेंलनाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फरी येथील पटांगणावर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आला.या सांस्कृतिक कला सम्मेंलनाचे उद्घाटन ग्रामपंचायत शिवराजपूर येथील उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले होते.सम्मेलनाचे समारंभाअध्यक्ष म्हणून राईसमिलचे संचालक निमजे होते.प्रमुख पाहूने म्हणून मेघराज बूराडे केंद्र प्रमुख कूरुड अनील ऊईके , बंडू भाऊ सिडाम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सर्व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पी.आर शेंडे आणि योगेश ढोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

