Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरजिल्हाधिकारी,एसपी यांचेसह १३ अधिकारी होणार एका रांगेत उभे.. - दबंग तलाठी विनोद...

जिल्हाधिकारी,एसपी यांचेसह १३ अधिकारी होणार एका रांगेत उभे.. – दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांनी न्यायालयातून दिला दणका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :- म्हणतात ना.! कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही.जो कायद्याच्या कचाट्यात अडकला,अश्यांचा तिथेच सोक्ष-मोक्ष लागतो.मग तो कितीही धुरंदर व्यक्ती कां असेना.! या ठिकाणी एका रांगेत उभे राहावेच लागते.अश्याच प्रकारे कायद्याचे अभ्यासक, संविधान प्रेमी,सामाजिक कार्यकर्ते दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांनी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या अधिकाऱ्यांना चक्क कायद्याच्या कटघऱ्यात उभे राहण्यासाठी भाग पाडले असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांसह(एस पी) १३ अधिकाऱ्यांना मंगळवारी २७ मे रोजी नोटीस बजावल्याने एकच खळबळ माजली आहे.प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,विद्यमान पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी शांतनू गोयल, राजुऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, जिवतीचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे,प्रवीण चिडे, अविनाश शेंबटवाड,तहसीलदार रूपाली मोगरकर,वरिष्ठ लिपिक पांडुरंग नंदुरकर,गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र जाधव,ठाणेदार कांचन पांडे,कुमार मंगलम बिरला,मनोहर तालेवार आदी १३ अधिकाऱ्यांना जिल्हा न्यायालयाने नोटीस बजावली असून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात येत्या १० जून २०२५ रोजी सुनावणी होणार आहे.

 

प्रकरण 👇

६५ वर्षांवरील वयोवृध्दांना संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचा लाभ दिला.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यात मरण पावलेल्या लाभार्थ्यांच्या नावाने १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला.यात मृत लाभार्थ्यांच्या खात्यावरील रक्कम तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचे पत्र देऊन बँकेतून विड्रॉल केल्याचे उघडकीस आले होते.जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशानुसार,तहसीलदार रूपाली मोगरकर यांनी याबाबत जिवती पोलिसांत तक्रार केली.यावरून मृतक संगणक चालक विलास येलनारे व अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विनोद खोब्रागडे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ४३८ नुसार चंद्रपूर जिल्हाधिकारी गौडा यांच्यासह १३ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!