Thursday, September 24, 2026
Homeनागपूरचोरीचा मोह अनावर झाला..! चोरी करायला गेला अन् तिथेच चिकटून राहिला..

चोरीचा मोह अनावर झाला..! चोरी करायला गेला अन् तिथेच चिकटून राहिला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आपण अनेकदा बघितले व ऐकले सुद्धा आहे की,चोर चोरी करण्यासाठी वाट्टेल ‘त्या’ युक्त्या पणाला लावीत असतात.अंग मेहनत न करता झटपट पैश्याच्या नादात ‘चट मंगणी पट ब्याह..!’ करून आनंद द्विगुणित करीत असतात.पण,त्यातून मिळणारा आनंद हा क्षणिक असतो,हेच अनेकजण विसरून जातात आणि सर्वकाही गमावून बसतात.असाच काहीसा आगळा-वेगळा प्रकार एका अट्टल चोरट्याच्या बाबतीत उघडकीस आला आहे.चोरट्याने वाढदिवस साजरा केल्यानंतर विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या पेटीतील साहित्य काढले आणि खांबावर असलेले साहित्य चोरण्यासाठी वर चढला.जिवंत तारेला स्पर्श होताच जोरात विजेचा धक्का लागला आणि चोरट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.सदरची घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माऊलीनगर,जामठा येथे रविवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली.
अंकुश राजेंद्र पटेल वय २५ वर्षे,रा.श्रमिकनगर, परसोडी,बेलतरोडी,नागपूर असे मृत चोरट्याचे नाव आहे.त्याने दोन मित्रांसोबत रविवारी रात्री नागपूर-बुटीबोरी मार्गावरील जामठा (ता.नागपूर ग्रामीण) परिसरातील एका धाब्यावर वाढदिवस साजरा केला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारात तिघेही घराकडे परत जात असतांना अंकुशला चोरीचा मोह अनावर झाला. लगेच तिघांनी जामठा येथील माऊलीनगर-९ मधील महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरचे साहित्य चोरण्याची योजना आखली.त्याने आधी ट्रान्सफॉर्मरच्या पेटीतील ग्रीपसह इतर उपकरणे चोरण्यासाठी काढून ठेवले.त्यामुळे वीजपुरवठा बंद झाला असावा,असे समजून तो खांबावर चढला आणि येथेच गफलत झाली.वर चढल्यावर त्याचा जिवंत तारेला स्पर्श झाला आणि लगेच मृत्युमुखी पडला.त्यामुळे त्याच्या दोन मित्रांनी तिथून पळ काढला.काल सोमवारी १३ जानेवारीच्या सकाळी नागरिकांना तो लोंबकळलेल्या अवस्थेत आढळून आला.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.त्याच्या अन्य दोन मित्रांचा शोध सुरू असून  याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
अंकुश पटेल हा सराईत गुन्हेगार असून,तो विजेची उपकरणे चोरण्यात पटाईत होता.त्याने आजवर अनेक ठिकाणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल,विजेचे तार,कॉइल,लोखंडी खांब व इतर साहित्य चोरून नेले आहेत.त्याच्या विरोधात नागपूर शहरातील बेलतरोडी पोलिस ठाण्यात चोरीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!