Friday, May 1, 2026
Homeचंद्रपूरचुकीचे औषध दिल्याने रुग्णाचा मृत्यू; ठाण्यात तक्रार दाखल….

चुकीचे औषध दिल्याने रुग्णाचा मृत्यू; ठाण्यात तक्रार दाखल….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- घुग्घूस येथील शिवानगर निवासी ५३ वर्षीय प्रवीण लिंगमपेल्ली यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी येथील खासगी रुग्णालयावर चुकीचे उपचार केल्याचा आरोप केला आहे.पोलिसांनी सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पोलिस पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच कारवाई करणार असल्याचे ठाणेदार आसिफ राजा शेख यांचे म्हणणे आहे.मृतक व्यक्ती हा गुप्ता कोलवाशरीमध्ये सुपरवायजर म्हणून काम करत होता.

मंगळवारी २ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता प्रवीण लिंगमपेल्ली यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या.त्यांची प्रकृती पाहून कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेले.तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून उपचार केले.रात्री ९ वाजे पर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यांची तब्येत सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला.कुटुंबीयांनी त्यांना घरी आणल्यानंतर दोन तासांनी रात्री ११ वाजता त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली.यावेळी कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ राजीव रतन रुग्णालयात आणले,तेथे उपस्थित डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्यांना तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.दरम्यान काल,बुधवारी सकाळी मयताचा मुलगा प्रणय लिंगमपेल्ली व इतर नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठून सदर खासगी रुग्णालयाविरुद्ध चुकीचे औषध दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली.या प्रकरणी घुग्घूस पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल केला आहे. संबंधित डॉक्टरला अटक करण्याची मागणी मृतकाचे नातेवाईक करत होते.यावर ठाणेदार आसिफ राजा शेख यांनी पीडित कुटुंबीयांना शवविच्छेदन अहवालात डॉक्टरने काही गैरप्रकार केल्याचे समोर आल्यास पोलिस संबंधित डॉक्टरवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!