Monday, September 28, 2026
Homeचंद्रपूरचिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली.सदरचा प्रकार वरोरा शहरातील बसस्थानक मार्गावरील आयटीआय लगत असलेल्या मनोज चिवडा सेंटरमध्ये घडला.येथील चिवडा खाल्ल्यानंतर काही जणांना मळमळ,उलटी व इतर त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.दूषित चिवड्यामुळे विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.सर्व रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेल्यांमध्ये प्रवीण शालीकराम कोहळे ५० वर्षे,रा.माजरी,सुवर्णा प्रवीण कोहळे वय ४५ वर्षे, रा.माजरी,पंकज दिगंबर आवारी वय ४० वर्षे,राराळेगाव, दिगंबर विठ्ठजी आवारी रा.राळेगाव,अफजल रफीक अहमदखान रा.भद्रावती/कोरेगाव,शेख रेहमान रा.कोरेगाव आणि आयुब सागीर खान रा.भद्रावती यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे, संबंधित चिवड्यात पाल आढळल्याचे सांगण्यात येत आहे.यामुळे खाद्यपदार्थांच्या स्वच्छता आणि गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू; मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत...

सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी देसाईगंज तालुक्यात ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’.. – आज जुनी वडसा येथे विशेष शिबिराचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पुरवठा विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देसाईगंज तालुक्यात सर्व शिधापत्रिका धारकांसाठी ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’ सुरू करण्यात आले आहे.देसाईगंज तहसील कार्यालयाच्या तहसीलदार...

विहिरीतून पाणी काढणार तितक्यात अचानकपणे पाय घसरल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.दिवसभर शेतातील कामे आटोपून विहिरीतून पाणी काढणार तितक्यात  अचानकपणे पाय घसरून तोल गेला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!