उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- चारचाकी वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना आज ७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील झरण गावाजवळ घडली आहे.
सदर घटना झरण गावाच्या अगदी जवळ घडली असून जंगल परिसरातून बिबट्या रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाची बिबट्याला जोरदार धडक बसली.जोरदार धडक बसताच बिबट्या जागीच ठार झाला.सदर घटनेची माहिती वनविभागास मिळताच वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या व इतर वन्य प्राण्यांचे अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.त्यामुळे सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.