Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरचवताळलेल्या वाघाची २१ वर्षीय तरुणावर झडप; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..

चवताळलेल्या वाघाची २१ वर्षीय तरुणावर झडप; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नुकतेच मंगळवार,१० मार्च रोजी जंगल परिसरात सरपण गोळा करीत असतांना वाघाने हल्ला चढवून एका इसमास ठार केल्याची घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंद्रपूर बफर वनपरिक्षेत्रातील मामला बीटाच्या कक्ष क्रमांक-३८४ मध्ये घडली होती.या हल्ल्यात जगन महासिंग धुर्वे वय ५० वर्षे,रा.मामला, ता.जि.चंद्रपूर यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच अवघ्या सहा दिवसांवर परत वाघाने झडप घालून एका २१ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची घटना काल,सोमवार १६ मार्चच्या दुपारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील चकनिंबाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक-३७७ मध्ये घडल्याने परिसरातील गावांमध्ये वाघाची प्रचंड दहशत पसरून नागरिक भयभीत झाले आहेत.करण किसन शेडमाके २१ वर्षे,रा.निंबाळा,ता.जि.चंद्रपूर असे वाघाने ठार केलेल्या तरुणाचे नाव असून करण काल सोमवारी  जनावरे घेऊन चकनिंबाळा शेतशिवारात गेला होता. दरम्यान,दुपारी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक जनावरांवर हल्ला चढवला.जनावरे जोरजोराने ओरडू लागल्याने करणने धाव घेत वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.मात्र,वाघ चवताळलेला असल्याने जनावरांना सोडून थेट करणच्या अंगावर
झडप घातली.यात करणचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक उपवसंरक्षक साकेत वाटोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांनी आपल्या वन विभागाच्या पथकासह घटनास्थळ गाठले.घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.वाघांच्या हल्ल्यांमुळे लोकांचे जिने हराम झाले असून वन विभाग ठोस उपाययोजना करण्यात फोल ठरत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!