Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरचमचमीत पदार्थ व पानठेल्यांवरील पाकिटाच्या मोहात चोरू लागले सायकली.. - गँग लीडर...

चमचमीत पदार्थ व पानठेल्यांवरील पाकिटाच्या मोहात चोरू लागले सायकली.. – गँग लीडर १२ वर्षाचा तर सहकारी सात वर्षाचा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-विविध चोऱ्या करणारे चोर बघितले,पण  चोरलेल्या सायकली कवडीमोल भावात विकून कधी आईची प्रकृती खराब आहे,तर कधी आजोबा-भाऊ दवाखान्यात भरती आहे,तर कधी अभ्यासाची पुस्तके घेण्यासाठी पैसे नसल्याची बतावणी करत चमचमीत पदार्थ व पानठेल्यांवरील पाकिटाच्या मोहात चार शालेय अल्पवयीन मुलांनी चक्क सायकलचोरांची टोळीच तयार केली.नवलाची बाब म्हणजे,टोळीतील सर्वात मोठा सदस्य १२ वर्षाचा,तर सर्वात लहान सदस्य सात वर्षांचा आहे.विशेष म्हणजे,एका मुलाला पानठेल्यावरील पुड्यांची आवड निर्माण झाली व त्यासाठी तो यात सहभागी झाला होता.प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून मुलांचे कथानक ऐकून सर्वजण अचंबित झाले.
सर्व मुले गरीब घरातील असून एकाच शाळेत शिकतात.कुणाला आईवडील नाही,तर कुणी नातेवाइकांकडे राहून शिक्षण घेत आहे.मुलांना अभ्यासात रस नसल्याने ते अनेकदा  शाळेला दांडी मारायची.फिरत असतांना ते अनेकदा विविध हॉटेल्सशेजारी गेले की तेथील खाद्यपदार्थ पाहून आपणही हॉटेलमध्ये काहीतरी खावे,अशी त्यांची इच्छा होत होती.पैसे नसल्याने त्यांनी सायकली चोरायला सुरुवात केली.पहिली सायकल त्यांनी तीनशे रुपयांना विकली व त्यातून एका हॉटेलमध्ये जाऊन भरपेट नाश्ता केला.त्यानंतर त्यांनी नागपूरच्या बेलतरोडी,हुडकेश्वर व अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १० सायकली चोरल्या.
  • असे अडकले जाळ्यात👇
नागपूरच्या मनीषनगर,बेलतरोडी येथील ४० वर्षीय आशिष उमाटे यांच्या मुलीची सायकल चोरी झाली. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला.तपासात पोलिसांनी एका सात वर्षाच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले व विचारपूस केली असता पोलिसांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. पोलिसांनी चारही मुलांना ताब्यात घेतले असून सात वर्षीय मुलाला काय वाईट व काय चांगले हे काहीच समजत नाही.त्याच्यात निरागसपणा असूनदेखील तो वाईट मार्गाला वळल्याचे पाहून पोलिसांनादेखील वाईट वाटले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!