- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-अस्वलाच्या तावडीत जो कुणी सापडला त्याची काही खैर नाही; मग तो कुणीही असो,त्यातच कित्तेकदा अस्वलाचे दर्शन हे दुर्लभच असते.अशातच देसाईगंज तालुक्याच्या चोप गावा शेजारील शेतशिवारात दिवसाढवळ्या अस्वलाचे दर्शन झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी १४ नोव्हेंबरच्या दुपारी अस्वलाचे दर्शन तर झालेच,पण अस्वलाने थेट शेतशिवारातील शेतात उभ्या ठेवलेल्या दुचाकीची तोडफोड केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
उन्हाळ्याच्या कालावधीत याच भागातील भर्रे पहाडी परिसरात केशव मासुरकर यांच्या शेतात अस्वलाचे दर्शन घडले होते.पावसाळ्याच्या कालावधीत जंगलात आश्रय मिळाल्याने अस्वल गाव परिसरात दिसून आली नाही.मात्र,आता धान कापणीच्या कामांनी वेग घेतला असता,धान पिकातील छोटे-मोठे पक्षी, प्राण्यांना शिकार बनविण्यासाठी तसेच तुरीचे पीक खाण्यासाठी पुन्हा अस्वल शेतशिवारात संचार करीत आहे.गुरुवारी दुपारच्या सुमारास मासुरकर यांच्या शेतात महिला मजूर वर्ग धान कापणी करीत असतांना अचानक जंगलातून अस्वलाने शेतशिवारात प्रवेश केला.यामुळे महिला मजुरांची तारांबळ उडाली. यादरम्यान शेतशिवारात असलेल्या मासुरकर यांच्या स्कुटीचे सीटकव्हर अस्वलाने फाडून दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.महिला मजुरांनी आरडाओरड केली असता अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले.याबाबतची माहिती वन विभागास देण्यात आली असून नागरिकांनी सावधानता बाळगावी; असे आवाहन वनविभागाने केले आहे.
- Advertisement -