Thursday, August 27, 2026
Homeभंडाराघरकुल लाभार्थ्यांच्या यादीतील नाव पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यासाठी १५ हजाराची मागणी.. -...

घरकुल लाभार्थ्यांच्या यादीतील नाव पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यासाठी १५ हजाराची मागणी.. – ग्रामसेवकास अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील विहिरगाव येथील ग्रामसेवकाने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांच्या यादीतील नाव पहिल्या टप्प्यात मंजूर करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली.प्रकरणी लाचखोर ग्रामसेवकास भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे.सदरची कारवाई काल,गुरुवारी ४ डिसेंबरला विहिरगाव ग्रामपंचायत कार्यालयात  करण्यात आली. प्रफुल्ल रतन गिरी वय ४६ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
ग्रामसेवक गिरी याने मे २०२५ मध्ये विहीरगाव येथे घरकुल संबंधाने स्वतः सर्व्हे केला होता.त्यावेळी तक्रारदार यांच्या वडिलांच्या घराचा सुद्धा सर्व्हे झाला होता.सर्व्हे झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने संबंधीतांना घरकूल मंजूर होणार होते.तक्रारदार यांचे वडिलांचे घरकूल यादीमधील पहिल्या टप्प्यात नाव मंजूर करून देण्याचा मोबदला म्हणून ग्रामसेवक गिरी याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार,२८ नोव्हेंबरला पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान,ग्रामसेवक प्रफुल्ल गिरी याने त्याच्या ग्रामपंचायत कार्यालयात पंचासमक्ष १५ हजारांची लाचेची मागणी स्वीकारण्याची सहमती दर्शवली.काल गुरुवारी कारवाई दरम्यान ग्रामसेवक प्रफुल्ल गिरी याने तक्रारदार यांचेकडून १५ हजारांची लाच रक्कम स्वीकारली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ त्यांना अटक केली.त्याच्याविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदरची कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस उपअधीक्षक अरुणकुमार लोहार यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!