Tuesday, September 29, 2026
Homeभंडाराग्रामसेवकाने ग्रामपंचायतीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीला लावला चुना…-कर्मचाऱ्याने ग्रामसेवका विरुद्ध तक्रार...

ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीला लावला चुना…-कर्मचाऱ्याने ग्रामसेवका विरुद्ध तक्रार केली दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- वरठी ग्रामपंचात कार्यालयात काम करणाऱ्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम तेथील ग्रामसेवकाने लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सुखदेव विठोबा मते असे अन्यायग्रस्त कर्मचाऱ्याचे नाव असून,त्यांनी काल,रविवारी दिनांक – १४ जुलै ला वरठी पोलिस ठाण्यात ग्रामसेवक दिगंबर गभने यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

हनुमान वॉर्ड,वरठी निवासी सुखदेव विठोबा मते हे वरठी ग्रामपंचायतमध्ये २ वर्ष नियमित कर्मचारी म्हणून नाली सफाई आणि पाईपलाईनचे काम करीत होते.३० ऑक्टोबर २०२३ रोजी ते सेवानिवृत्त झाले. सेवेत असताना त्यांच्या पगारातून १०९० रुपये कपात होत होते.तर तेवढीच रक्कम ग्रामपंचायतच्यावतीने त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होत होती. याशिवाय भविष्य निर्वाह निधीची रक्कम अधिक मिळावी,या हेतुने सुखदेव त्यांच्या पगारातून अतिरिक्त १०० रुपये कपात केले जात होते.सन २०२० ते २२ असे दोन वर्ष मते यांच्या पगारातून दरमहा एकूण ३१८० रुपये कपात होत होती.ही सर्व रक्कम ग्रामपंचायत सचिव तथा ग्रामसेवक दिगंबर गभने यांच्याकडे जमा राहत होती.८ महिन्यांपूर्वी सुखदेव मते सेवानिवृत्त झाले.सेवानिवृत्त झाल्यानंतर सुखदेव त्यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची मागणी ग्रामपंचायतकडे केली.जुलै २०२१ ते ऑक्टोबर २०२३ अशा १५ महिन्याचे ८९ हजार ४० रुपये अफरातफर करून ग्रामसेवक दिगंबर गभणे यांनी त्याच्या खिश्यात घातले असल्याचा आरोप मते यांनी केला आहे.गभने यांनी ही रक्कम कोणत्या शासकीय कामात खर्च केली किंवा वैयक्तिक लाभासाठी,याबाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे मते यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

यासाठी त्यांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाच्या वाऱ्या केल्या. मात्र,८ महिने लोटूनही त्यांना त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळत नव्हती.अखेर त्यांनी याबाबत सखोल चौकशी केली असता धक्कादायक वास्तव त्यांच्या समोर आले.त्यांना पगारातून कपात होत असलेल्या भविष्य निर्वाह निधीवर ग्रामसेवकाने डल्ला मारल्याचे त्यांना कळले.ग्रामसेवक दिगंबर गभने यांनी २०२१ ते २२ या वर्षभरातील मते यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलीच नसल्याची माहिती त्यांना मिळाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांची कोंबडा बाजारावर धाड; पाच जणांना रंगेहाथ अटक..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही ते चिचगाव मार्गावरील जंगलशिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार खेळणाऱ्या पाच जणांना ब्रम्हपुरी पोलिसांनी रंगेहाथ अटक...

आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि गावंडे यांनी नुकतेच ग्रामीण रुग्णालय आष्टी,उपजिल्हा रुग्णालय अहेरी आणि महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे भेट देऊन...

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!