Tuesday, September 29, 2026
Homeगडचिरोलीशिक्षण आणि नोकरीत अनाथ बालकांना १ टक्के आरक्षण..-अनाथ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गडचिरोली जिल्हा...

शिक्षण आणि नोकरीत अनाथ बालकांना १ टक्के आरक्षण..-अनाथ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गडचिरोली जिल्हा बाल संरक्षण कक्षात करा सपंर्क…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ अन्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ,निराधार बालकांना जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागते.त्यामुळे अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा तसेच कुटुंबात राहून ज्या अनाथ बालकांचे संगोपन झालेले आहे; अशा बालकांना संस्थात्मक व संस्थाबाह्य या नमुन्यात अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहे.या नुसार अनाथांना शिक्षण व नोकरीत यामध्ये १ टक्के आरक्षण लागू करण्यात आलेला आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात आता पर्यंत १५७ अनाथ बालकांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलेले आहे.विविध विभागांच्या झालेल्या पद भरती मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ५ बालके शासकीय नोकरीवर लागलेले आहेत. 

अनाथ आरक्षण पात्रता निकष👇

संस्थात्मक” या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आहे व ज्यांचे शासन मान्यता प्राप्त संस्थामध्ये पालन पोषण झाले आहे(त्यांच्या नातेवाईकाची अथवा जातीची माहिती उपलब्ध असो किंवा नसो) अशा बालकांचा समावेश असेल.“संस्थाबाह्य” या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आहे व ज्यांचे शासन मान्यता प्राप्त संस्थाबाहेर/नातेवाईकांकडे संगोपन झालेले आहे; अशा बालकांचा समावेश असेल.

अनाथ प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे👇

विहित नमुन्यातील लाभार्थी यांचा अर्ज,वडिलांचा मृत्युचा दाखला,आईचा मृत्युचा दाखला,जातीचा दाखला,लाभार्थी बालक यांचे आधार कार्ड,लाभार्थी पालकांचे आधार कार्ड,लाभार्थीचा जन्मदाखला, शाळेत शिकत असल्याचे प्रमाणपत्र(बोनाफाईड)किंवा टी.सी.,अनाथ असल्याबाबत ग्रा.प/न.प.यांचे शिफारस प्रमाणपत्र,पासपोर्ट साईजचे फोटो सर्व कागदपत्रे हे तीन बंच फाईल सह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सादर करावे. 

अनाथ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी व अधिक माहिती करिता जिल्हा बाल संरक्षण कक्ष,गडचिरोली या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक -०७१३२२२२६४५ तसेच  Email Id : dcpu.gadchiroli@gmail.com  यावर किंवा संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) मोबाईल क्र.९५९५६४४८४८ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा; असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि गावंडे यांनी नुकतेच ग्रामीण रुग्णालय आष्टी,उपजिल्हा रुग्णालय अहेरी आणि महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे भेट देऊन...

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू; मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!