उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- राज्य निवडणूक आयोगाने दिनांक- ३ ऑक्टोंबर २०२३ रोजी राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी कार्यक्रम देण्यात आलेला आहे.या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीद्वारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून दिनांक-१६ ऑक्टोंबर २०२३ ते दिनांक-२० ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहे.त्यानुसार दिनांक- १६ ऑक्टोंबर २०२३ पासून संगणकप्रणालीद्वारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र (affidavit) संगणकप्रणालीद्वारे भरले जात आहे. मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. सदर तांत्रिक अडचण maha online कडून दूर करण्यात आली आहे.सबब दिनांक- १८ ते २० ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी ११.०० ते दुपारी ३.००वा.पर्यंतची वेळ आता सायं.५.३० पर्यंत वाढविण्यात येत असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.