उद्रेक न्युज वृत्त
मूल (चंद्रपूर) :- मूलतालुक्यातील जुनासुर्ला ग्रामपंचायत येथील संगणक परिचालकाने ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोग बँक खात्यातील शिल्लक असलेला निधी थेट स्वतःच्या खात्यात वळती करून ऑनलाइन जुगारात उडविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सदर घटनेने जिल्हा परिषद विभागात एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत जुनासूर्ला येथील १४ वा वित्त आयोगाचा कालावधी संपला.मात्र जुनासुर्ला ग्राम पंचायतीचा ८ लाख ४० हजार रुपयांचा निधी अखर्चित होता. शासनाने सदर आयोगातील निधी खर्च करण्यास एक वर्षांची मुदतवाढ दिली होती.संधीचा फायदा घेत संगणक परीचालक किशोर पाटेवार याने सरपंच व ग्रामसेवक दोघांच्या डीएससीचा डिजिटल सिग्नेचरचा गैरवापर करीत १४ वा वित्त आयोगातील ८ लाख २९ हजारांचा निधी टप्प्याटप्प्याने आपल्या स्वतःच्या बँकखात्यात वळती करून सदरची रक्क्म ऑनलाइन जुगारावर उडविली.सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी; अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.