Wednesday, September 2, 2026
Homeमुंबईग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालय इमारत बांधण्यासाठी मिळणार अनुदान…-ग्रामविकास विभागाने घेतली दखल…

ग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालय इमारत बांधण्यासाठी मिळणार अनुदान…-ग्रामविकास विभागाने घेतली दखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागात दोन हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या,परंतु स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना बांधकामासाठी राज्य सरकारकडून २५ लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे.तसेच ग्रामपंचायत स्वनिधीची अटही रद्द करण्यात आली आहे.याबाबत ग्रामविकास विभागाने शुक्रवारी शासन निर्णय जारी केला आहे.

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही; अशा ग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालय इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना लागू करण्यात आली आहे.अशा ४ हजार २५२ ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधण्यासाठी २०१८-१९ ते २०२१-२२ या चार वर्षांसाठी मंजूरी देण्यात आली होती.त्यानुसार १ हजार ७४८ पंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.आता योजनेला २०२७-२८ पर्यंत मुदतवाढ देतानाच इमारत बांधकामासाठीच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार इमारत नसलेल्या दोन हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या पंचायतींना १५ लाखाऐवजी २० लाख व दोन हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्यांना १८ लाखाऐवजी २५ लाखांचे अनुदान मिळणार आहे.

ग्रामसभेचा ठराव बंधनकारक👇

ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही; अशा ग्रामपंचायतींना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून त्यांच्या कार्यालयाचे बांधकाम करावयाचे असल्यास त्यांना प्रथम ग्रामसभेत ठराव करावा लागणार आहे.ठराव संमत केल्यावर संबंधित ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय उपलब्ध नसल्याची तसेच कार्यालयासाठी जागा उपलब्ध असल्याची खात्री केल्यावर जिल्हा परिषदेकडून अंतिम मंजूरी दिली जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!