Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमागणी तीन कोटींची; डील ५१ लाखात; पहिला हफ्ता वसूल अन् दुसऱ्या हफ्त्यात...

मागणी तीन कोटींची; डील ५१ लाखात; पहिला हफ्ता वसूल अन् दुसऱ्या हफ्त्यात अटक…-ईडी अधिकाऱ्याचा कारनामा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- ज्यांच्या कचाट्यातून मोठ-मोठे संत्री,मंत्री व इतरांनाही पाणी प्यावे लागते व हल्ली मोठा धाक व दरारा निर्माण करणारा विभाग म्हणजे ईडी यालाच आपण सक्तवसुली संचलनालय असे संबोधतो.दुसऱ्यांची पुंगी वाजविणारे स्वतःच पुंगीत सापडत असतील तर याला काय म्हणावे? असाच प्रकार उघडकीस आला आहे.तामिळनाडूत सरकारी अधिकाऱ्याकडूनच २० लाखांची लाच घेताना सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंकित तिवारीला बेड्या ठोकल्या आहेत.दरम्यान याप्रकरणी आता नवे खुलासे होत आहेत; ज्यामुळे खळबळ माजली आहे. अधिकाऱ्याला १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. 

अंकित तिवारीने एकूण ३ कोटींची लाच मागितली होती.यानंतर ५१ लाखांमध्ये ही डील ठरली होती. अंकित तिवारी यामधील २० लाखांचा दुसरा हफ्ता घेत असतानाच रंगेहाथ पकडत बेड्या ठोकण्यात आल्या.अंकित तिवारीला अटक केल्यानंतर ईडीच्या मदुराईमधील कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. याशिवाय अधिकाऱ्यांनी त्याच्या घरातही सर्च ऑपरेशन केले.याप्रकरणी मदुराई आणि चेन्नईमधील अनेक अधिकारी सहभागी असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

अंकित तिवारी अनेक लोकांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून करोडोंची लाच घेत होता.लाच म्हणून मिळालेले हे पैसे तो इतर अधिकाऱ्यांमध्येही वाटत होता अशी सूत्रांची माहिती आहे.अंकित तिवारीकडून काही कागदपत्रंही जप्त करण्यात आली असून, मदुराई,चेन्नईतील काही ईडी अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाऊ शकते.२९ ऑक्टोबरला अंकित तिवारीने डिंडीगुल येथील सरकारी कर्मचाऱ्याशी संवाद साधला.या कर्मचाऱ्याविरोधातील डीव्हीएसी प्रकरणाचा उल्लेख केला,जे बंद झाले होते.अंकित तिवारीने कथितपणे सरकारी अधिकाऱ्याला सांगितले की, पीएमओने ईडीला या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले असून, तुम्हाला चौकशीसाठी ३० ऑक्टोबरला मदुराईच्या ईडी कार्यालयात उपस्थित राहायचे आहे.सरकारी कर्मचारी मदुराईतील कार्यालयात पोहोचला असता अंकित तिवारीने त्याच्याकडे केस बंद करण्यासाठी ३ कोटींची लाच मागितली.यानंतर त्याने कर्मचाऱ्याला सांगितले की,माझे माझ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी बोलणे झाले असून ५१ लाखात डील करण्यास तयार असल्याचा दावा केला.१ नोव्हेंबरला सरकारी कर्मचाऱ्याने कथितपणे ईडी अधिकाऱ्याला २० लाखांचा पहिला हफ्ता दिला.नंतर अंकितने सरकारी कर्मचाऱ्याला आपल्याला वरिष्ठांमध्ये पैसे वाटायचे आहेत; असे सांगत सर्व रक्कम एकत्र देण्यास सांगितले.अंकितने व्हॉट्सअप आणि मेसेज पाठवत सरकरी कर्मचाऱ्याला तसे न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला.अंकित तिवारीच्या मागण्या पाहून सरकारी कर्मचाऱ्याला संशय आला आणि त्याने 30 नोव्हेंबरला डीवायएसीच्या डिंडीगुल कार्यालयात तक्रार दाखल केली.१ डिसेंबरला अंकित तिवारी २० लाखांचा दुसरा हफ्ता स्विकारत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!