उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-समाजवादी पार्टी युवा जनसभेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी देसाईगंज तालुक्याच्या उसेगाव येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ता कैलास बगमारे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार अबू आसिम आजमि, प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्धीकी,युवा जनसभा प्रदेशाध्यक्ष फहाद अहेमद यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाच्या अल्पसंख्याक वीभागाच्या जिल्हा महासचिव पदी असलम शेख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.सदर नियुक्ती ने जिल्ह्यात समाजवादी पक्षाकरिता आणखी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून भविष्यात समाजवादी पार्टी संपूर्ण जिल्ह्यात पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे चित्र दिसू लागत आहे. देसाईगंज तालुका महिला सभेच्या अध्यक्ष पदी लताताइ मेश्राम यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.सदर नियुक्ती पत्र हे देसाईगंज येथे झालेल्या सभेमध्ये जिल्हाध्यक्ष इलियास खान यांच्या हस्ते देण्यात आले.
नव नियुक्ती बद्दल खलील खान,जिब्राइल शेख,डोमा दिवटे,जावेद कुरेशी,शौकत पन्ज्वानि,फैजान पटेल, मुजीब शेख,महेबुब शेख,प्रा.दिलीप कहुरके,प्रीतम जणबंधू,नरेश वासनिक,हिवराज वासनिक आदींनी सर्वांचे अभिनंदन केले आहे

